मुंबई : बॉलिवूडमधील गायक- अभिनेता आदित्य नारायण याने आपल्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याची मुलगी एका परीसारखी दिसतेय. आदित्यने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य नारायणने पहिल्यांदाच त्याच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या राजकूमारीची झलक दाखवली आहे. या राजकुमारीचे नाव त्विशा असे आहे. आदित्यने शेअर केलेल्या फोटोत त्विशा एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी दिसत नाही. केसांमध्ये क्युट हेअर बँड घातलेली त्विशा खूपच क्यूट दिसतेय.


मुलीचा फोटो शेअर करत आदित्यने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, माझी एंजल आज तीन महिन्याची झाली आहे. आणि ही माझी परी आहे असे त्याने लिहले आहे. 


छोट्या त्विशाचे इंस्टाग्राम अकाऊंटही उघडण्यात आले आहे. या अकाऊंटवर त्विशाचे काही मिनिटांतच 2000 पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. सध्या त्विशाच्या या फोटोला खुप पसंत केले जात आहे.  



आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवालने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. आदित्यने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित ही आनंदाची बातमी शेअर केली होती.