बॉलिवूडच्या दबंग सलमानपासून दूर राहावं असं आता `या` पाकिस्तानी अभिनेत्री वाटतंय
90च्या दशकात तिची आणि सलमान खानची लव्हस्टोरी चर्चेत होती.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली अभिनेता सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल नेहमीच ओपन होती. 90च्या दशकात तिची आणि सलमान खानची लव्हस्टोरी चर्चेत होती. हे दोघं बराच काळ एकत्र होते, पण सोमी अलीने 1999 मध्ये अभिनेत्याशी ब्रेकअप केलं. ब्रेकअपच्या 22 वर्षांनंतर आता सोमी अलीने सलमान खानबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
सोमी अलीने दिलेल्या एका मुलाखतमध्ये आपल्या फिल्मी करिअरव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चा केली आहे. सोमी अलीने 'बुलंद' या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले होतं. मात्र, हा चित्रपट कधीही प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सोमी अली आणि सलमान खान एकमेकांच्या जवळ आले होते.
सोमी अली म्हणाली, "सलमान खानने त्यावेळी नुकतच होम प्रोडक्शन सुरु केलं होतं आणि तो आपल्या 'बुलंद' चित्रपटासाठी लीड अभिनेत्री शोधत होता. आम्ही शूटसाठी काठमांडूला गेलो होतो. दुर्दैवाने, मी खूप तरूण आणि नवीन होते. निर्मात्यांना या सिनेमाबाबत थोडी समस्या होती आणि यामुळे हा चित्रपट थांबवण्यात आला.
जेव्हा सलमान खानच्या संपर्कात आहे का? असा प्रश्न सोमीला विचारला गेला यावर सोमी अली म्हणाली, 'सलमान खानशी मी पाच वर्षं बोलले नाही. मला असं वाटतं की, पुढे जाणं चांगलं आहे. मी पुढे गेले आहे आणि तोही पुढे गेला आहेत. डिसेंबर 1999मध्ये मी त्याच्या आयुष्यातून कायमचे लांब गेले. यानंतर त्याच्या किती गर्लफ्रेंन्ड आहेत हे मला माहित नाही. मी त्याला शुभेच्छा देते.
सोमी अली पुढे म्हणाले की, 'मला माहित आहे की सलमानचा एनजीओ खूप चांगली कामगिरी करत आहे आणि मला त्याचा बीइंग ह्युमन फाउंडेशनचा अभिमान आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या, त्यांच्याशी संपर्क न ठेवणं माझ्या हेल्थसाठी चांगलं आहे. तो एका चांगल्या ठिकाणी आहे आणि तो तिथे आनंदी आहे मला फक्त या गोष्टीची काळजी होती.' यानंतर सोमी अलीच्या या वक्तव्यावर बरीच चर्चा सुरुये.