Suhana Khan and Aryan Khan Spotted: अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) आपल्या आगामी चित्रपटांच्या निमित्ताने शूटिंग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. परंतु शाहरूखच्या या दोन आगामी पठाण (Pathaan) आणि जवान (Jawaan) चित्रपटांच्या चर्चेसोबतच चर्चा आहे ती शाहरूखच्या मुलांची म्हणजे सुहाना खान (Suhana Khan) आणि आर्यन खानची (Aryan Khan). (bollywood star kids aryan khan and suhana khan spotted at airport netizens trolls video viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण शाहरूख खानची दोन्ही मुलं आता लवकरच मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. सुहाना खानचा 'द आर्चिज' (The Archies) हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्स प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी शाहरूख खाननं सुहानासाठी एक खास आणि इमोशल पोस्टही शेअर केली होती. 


आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!


आर्यन खान त्याच्या नवीन वेब सीरिजवर काम करत आहे. रविवारी दोघेही मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. (Aryan Khan and Suhana Khan Spotted) आर्यन, सुहाना आणि त्यांचा एक चुलत भाऊ सुट्टीवर जात असल्याचे बोलले जात आहे. हे तिघेही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या कारमधून उतरताना दिसले. गाडीतून उतरल्यानंतर ते तिघेही विमानतळाच्या आत गेले आणि तिथे फोटोग्राफर्सनी त्यांनी घेरले. सध्या सुहाना आणि आर्यनचे हे फोटो सगळीकडेच व्हायरल होत आहेत. 

आर्यनच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्याने ग्रे कलरचा फुल स्लीव्ह टी-शर्ट घातला होता. या टी-शर्टसोबत त्याने काळ्या रंगाची कार्गो पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचे शूज घातले होते. तर सुहानाने पांढऱ्या रंगाची लूज ट्राउजर घातली होती. तिने ट्राउझर क्रॉप टॉप आणि क्रॉप जॅकेटसोबत पेअर केला होता. आर्यनप्रमाणे सुहानानेही पांढऱ्या रंगाचे शूज घातले होते. तिच्या हातात लेडीज पर्स होती. 


आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय


परंतु त्यांच्या हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या अनेक चांगल्या वाईट कमेंट येतायत. (Aryan and Suhana Khan Viral Video) त्यातून बऱ्याच ट्रोलर्सनी त्यांना जोरदार ट्रोलही केलं आहे. अनेकांनी असं म्हटलंय की 'दर पंधरा दिवसांनी एअरपोर्टवर स्पॉट होतात, एअरपोर्टवर काय हे फिरायला येतात का?' तर दुसऱ्या एका ट्रोलरनं लिहिलंय की 'फिरायला जाताना हे बॅगमध्ये काही भरतात की नाही?' अशी टाचूनही अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 


 

 

 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



सुहाना खान झोया अख्तरच्या आर्चीज या चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर देखील दिसणार आहेत. आर्यन खानला सध्या कॅमेऱ्याच्या मागे काम करायचे असले तरी. यासाठी तो एका वेब सीरिजवर काम करत आहे. या मालिकेची संकल्पना खुद्द आर्यनची आहे.