`येथे` जेवणासाठी लाखो रुपये खर्च करतात बॉलिवूड स्टार्स
कलाकारांच्या डाएटविषयी खुलासा...
मुंबई : कलाविश्वातील कलाकार शूटिंगवेळी कसे फिट राहतात? बॉलिवूड स्टार्स दिवसभर काय खातात? त्यांच्या डाएटकडे ते कसं लक्ष ठेवतात? तर... बॉलिवूड कलाकारांकडे त्यांचे स्वत:चे फिटनेस ट्रेनर्स असतात. पण याशिवाय या कलाकारांच्या डाएटविषयी आणखी एक खुलासा झाला आहे.
शूटिंगवेळी कलाकार त्यांचं परफेक्ट डाएट कसं मेन्टंन करतात? रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, अर्जुन कपूर हे कलाकार एका सर्विसचा फायदा घेत त्यांच्या हेल्दी डाएटची काळजी घेतात.
Pod Supply नावाची सर्विस या कलाकारांना जेवण पुरवते. ही एक मील सर्विस आहे जी, हेल्दी डाएटसाठी लाखों रुपये चार्ज करते.
रणवीर सिंह '83' चित्रपटाच्या शूटिंग शेल्डूलमध्ये याच सर्विसमधून जेवणाची सर्विस घेत असल्याचं बोललं जात. आदित्य रॉयने 'मलंग' चित्रपटाच्या शेड्यूलदरम्यान येथूनच सर्विस घेतली होती.
अक्षय कुमार, अनिल कपूरही Pod Supply या सर्विसद्वारेच आपल्या डाएटची काळजी घेतात.
सेलिब्रिटींना जेवणावर लाखो रुपये खर्च करुन हेल्दी डाएट फॉलो करणं परवडणारं आहे. मात्र, सर्वच सामान्यांना ते परवडणारं नाही.
आता सामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी पॉड सप्लाय लवकरच पॉड लाइट सर्विस सुरु करणार आहेत. जे लोक त्यांच्या डाएटबाबत अतिशय सतर्क असतात, त्यांच्या खाण्या-पिण्याची काळजी घेत असतात अशा सामान्य लोकांसाठी ही सर्विस फायदेशीर ठरणार आहे.