Bollywood Star Sanjay Dutt Change His Car Plate Number: बॉलिवूडमधील अनेक कलाकार ज्योतिष आणि अंकशास्त्रावर विश्वास ठेवतात. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असला तरी ही बाब वारंवार अधोरेखित झाली आहे.  बोटातील अंगठ्या आणि हातातील ब्रॅसलेटपासून ठरावीक पद्धतीचे कपडे परिधान करताना दिसतात. तसेच आपल्या मोबाईल नंबर्सपासून गाड्यांचा ठरावीक नंबर ठेवतात. त्याचबरोबर कलाकार चांगला मुहूर्त पाहून आपली कामं मार्गी लावत असतात. बॉलिवूड कलाकारांकडे अलिशान गाड्या पाहायला मिळतात. यात अभिनेता संजय दत्त देखील मागे नाही. पण आता अभिनेता संजय दत्त अलिशान गाडीमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय दत्तकडे फेरारी 599 पासून दोन सीटर ऑडी R8 आणि लॅव्हिश पोर्श एसयूव्हीपर्यंत अनेक अलिशान गाड्या आहेत. विशेष म्हणजे, या सर्व कारचा नंबर  4545 आहे. या नंबरची बेरीज (4+5+4+5=18 आणि 1+8=9) केली तर 9 येते. मात्र आता एका ज्योतिषाच्या सल्ल्यानंतर संजय दत्तने आपल्या गाडीचा नंबर '2999' असा केला आहे. संजय दत्तच्या जवळच्या सूत्रांनी पिंकविला या वेबसाईटला याबाबतची माहिती दिली आहे. सूत्रांनी वेबसाईटला सांगितलं की, "एका ज्योतिषाने गाडीचा नंबर 4545 वरून 2999 असा बदलण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे वैयक्तिक तसेच भरभराटीसाठी मदत होईल"


"संजय दत्तने एक महिन्यापूर्वी एक अलिशान मर्सिडीज बूक केली होती. या गाडीसाठी 2999 हा नंबर देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे ही नव्या नंबरसह दिसेल.", असंही सूत्रांनी पुढे सांगितलं. 


संजय दत्तचा जन्म 29 जुलै रोजी झाला असल्याने 2999 हा नंबर सूचवण्यात आला आहे. त्याचबरोबर संजय दत्त फेब्रुवारी 2016 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर 29 जानेवारी 2017 पासून चित्रपटाची शूटिंग सुरु केली होती. 29 जानेवारीपासून नवीन आयुष्याची सुरुवात केली होती. त्यामुळे संजय दत्त त्याच्या नव्या गाडीचा नंबर काय घेतो? याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे.