मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आज आनंद आहुजासोबत विवाहबद्ध होणार आहे. त्यापूर्वी रविवारी मेंहदी आणि संगीत सोहळा पार पडला. रविवारी मुंबईतील ब्रांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात बॉलिवूडर्स स्टार्सने उपस्थिती लावली. सोहळ्याची थीम व्हाईट कलर असल्यामुळे अधिकतर पाहुण्यांनी वेगवेगळ्या शेड्सचे ड्रेस घातले होते. हर्षवर्धन आणि रिया कपूरनेही सफेद रंगाचे सुंदर ड्रेस परिधान केले होते. तर जान्हवी आणि खुशी देखील गोल्डन रंगाच्या लेहंग्यात दिसल्या. कार्यक्रमाला अभिनेत्री शिल्पा शेट्टी, स्वरा भास्कर आणि जॅकलिन फर्नांडीस यांनीही उपस्थिती लावली. तर दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा आपल्या पत्नीसमवेत संगीत सोहळ्यात पोहचले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सोनमच्या संगीत सोहळ्यात चुलत भाऊ अर्जुन कपूर आणि दिग्दर्शक करण जोहर देखील सहभागी झाले.




सोनम कपूरच्या लग्नासाठी संपूर्ण बॉलिवूडकर अत्यंत उत्सुक आहेत. सोनमने देखील आपले संगीत आणि मेंहदी फंक्शन खूप एन्जॉय केले. 



सोनम कपूरच्या संगीत सोहळ्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. या सोहळ्यात वडील अनिल कपूर यांनी भांगडा केला असून सोनम देखील होणारा पती आनंद आहुजासोबत थिरकली. आज दोहेही विवाहबद्ध होणार आहेत.