मुंबई : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal)चा 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' (URI The Surgical Strikes) सिनेमा शुक्रवारी रिलीज होत आहे. या सिनेमाला आलिया भट्ट, रणवीर सिंह, रणबीर कपूर, वरुण धवन, आयुष्मान खुराना, भूमी पेडनेकर, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर, रोहित शेट्टी, एकता कपूर यांनी एकत्र शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ सध्य़ा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी हे स्टार्स दिल्लीला गेले होते. या सगळ्या बॉलिवूड कलाकारांनी बुधवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. या दरम्यान अनेक दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला होता.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडच्या या कलाकारांनी सिनेमाच्या तिकीटावरील जीएसटी कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा केली. सगळ्यांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी देखील काढला. दिल्लीवरुन मुंबईला येत असताना विमानात विक्की कौशल यांने एक व्हिडिओ बनवला. ज्यामध्ये तो सिनेमातील काही डायलॉग बोलत आहे. 'हमारा जोश कैसा है?' यावर इतर स्टार्स देखील त्याला दाद देत आहेत. 'हमारे से लेकर आप तक... कल रिलीज हो रही है. उरी: द सर्जिकल स्ट्राइक. हमारा जोश कैसा है?' असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. 'उरी' सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी पंसती दाखवली.



करण जोहर, रणवीर सिंह, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, रोहित शेट्टी यांना पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.