मुंबई : भारती सिंगला आज कोण ओळखत नाही. मात्र, या टप्प्यावर पोहोचण्यासाठी तिने खूप परिश्रम घेतले आहेत. भारतीने नुकताच एक किस्सा शेअर केला. हा किस्सा त्या दिवसातला आहे जेव्हा ती स्पोर्ट्स कोट्यात नेमाबाजपटू होती. ती म्हणाली की, 'मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा आम्हाला सरकारकडून विनामूल्य जेवण मिळायचं. मला प्रत्येकी पाच रुपयांची तीन कूपन मिळायची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कूपनबरोबर एक ग्लास ज्यूसदेखील उपलब्ध होता. माझ्याकडे एक ग्लास ज्यूस असायचा. तो एक ग्लास रस पिल्यानंतर मला तासनतास उभं राहून रायफल शूटिंगचा सराव करावा लागायचा. मी माझ्या घरच्यांसाठी काही कूपन साठवायचे आणि महिन्याच्या शेवटी, मी त्या कूपनच्या बदल्यात फळं आणि ज्यूस घरी घेवून जायचे.


या शिवाय भारती सिंग तिच्या सुरुवातीच्या जीवनाविषयी आणि शिवणकाम आणि मशीनच्या सतत आवाजाच्या वातावरणात कशी राहिली याबद्दल दिलदारपणे म्हणाली की, 'आमच्या घरी दररोज पुरेसं जेवण नसायचं. घरात नेहमी शिवणकामाची मशिन चालू असायची आणि त्या मशिनचा आवाज येत रहायचा, तिची आई ओढणी शिवायची. आजही मी जेव्हा सेटच्या कॉस्ट्यूम रूममध्ये जाते, तेव्हा मी मशीनचा आवाज ऐकून घाबरून जाते.''


ती पुढे म्हणाली की, 'मी 21 वर्षांपासून त्या मशीनच्या आवाजात राहत होते. मला तिथे परत जायचे नाहीये. माझी कधीच फार मोठी स्वप्नं नाहीत पण माझ्याकडे जे काही आहे. ते मी साठवून ठेवेन अशी मी देवाला कायम प्रार्थना करत असते. आम्ही मीठ आणि भाकरी खाऊन राहिलो आहोत, पण आता आमच्याकडे दोन वोळचं चांगलं डाळ, भाज्या असं चांगलं जेवण बनतं.  मला फक्त अशी आशा आहे की, माझ्या कुटुंबात कायम कमीतकमी डाळी खायला असावी. मला कधीही माझ्या कुटुंबाची जुनी स्थिती पहायची नाही.''