मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शोमधील सगळ्याच कलाकारांनी प्रत्येक घरात आपलं स्थान निर्माण केलं आहे. बबिता जी असो किंवा शोमध्ये अल्पावधीसाठी दिसलेली 'दीप्ती'ची भूमिका साकारणारी आराधना शर्मा असो, सगळेच कलाकार चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आराधना रिअल लाइफमध्ये खूप जास्त बोल्ड आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच आराधनाने एक अतिशय बोल्ड फोटोशूट केलं आहे. आराधनाचा हॉटनेस पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे चाहते तिच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि तीही चाहत्यांचं मन मोडत नाही. यावेळीही आराधनाने असंच काहीसं केलं आहे.


लेटेस्ट फोटोशूटमध्ये आराधनाने फक्त शर्ट घातला आहे. लाँन्ग शर्टमध्ये आराधना खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये आराधनाने शर्टची वरची बटणं उघडी ठेवली आहेत. त्यामुळे हे स्पष्ट होतं की तिने आतमध्ये काहिच परिधान केलेलं नाही.



आराधना शर्मा अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अभिनेत्री नेहमीच तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत पोस्ट करत असते. तिचा प्रत्येक फोटो इंटरनेटवर येताच व्हायरल होतोच. आराधना शर्माचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. ती तिच्या हॉट फोटोंसोबत तिचे डान्स व्हिडिओ पोस्ट करत असते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.