मुंबई : टेलिव्हिजन आणि बॉलिवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेता कुशल पंजाबी  Kushal Punjabi  याने आत्महत्या करत त्याचं जीवन संपवलं. त्याच्या निधनाने अनेकांनाच धक्का बसला. कित्येकांना तर, अद्यापही त्याच्या जाण्याची बाब पचनी पडलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वांद्रे येथील राहत्या घरी कुशलने आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी त्याने एक पत्र लिहिलं होतं. ते पाहता यात मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून कुशल पंजाबी याला काम मिळत नसल्यामुळे तो नैराश्यात गेला होता असं त्याच्या मित्रांचं म्हणणं आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून घेतली आहे. 


कुशलच्या मनात आणि त्याच्या डोक्यात नेमकी कोणती समीकरणं सुरु होती, ज्यामुळे त्याला थेट आयुष्यच संपवण्याचं पाऊल उचलावं लागलं असे कैक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सध्या त्याने आत्महत्या करण्यापूर्वी केलेली सोशल मीडिया पोस्टही चर्चेचा विषय ठरत आहे. अतिशय धक्कादायक आणि हादरा देणारं पाऊल उचलणाऱ्या कुशलने आत्महत्येच्या काही तासांपूर्वीच त्याच्या मुलासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. 


वाचा : आयुष्याची शाश्वती नाही..., कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर सुयश टिळकची भावनिक पोस्ट 




कुशलने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये त्याच्या मुलासोबत तो अतिशय आनंदात दिसत होता. फार काही कॅप्शन न लिहिता त्याने तीन रंगांच्या हृदयाची चिन्हं सोबत जोडली होती. ही पोस्ट केल्यानंतर पुढच्या काही तासांनी त्याच्या आत्महत्येची बातमी समोर आली. ज्यामुळे अनेकांच्या काळजात चर्रsss झालं. कुशलच्या निधनानंतर अनेकांनीच हळहल व्यक्त केली. सोबतच मानसिक स्वास्थ्य, ताणतणाव, नैराश्य याचे मानवी मनावर, जीवनावर आणि विचारांवर होणारे परिणाम आणि त्यातून घेतले जाणारे टोकाचे निर्णय या मुद्द्यांवरही चिंता व्यक्त केली गेली.