... आणि Varun Dhawan चा पारा चढला; पाहा असं नेमकं का झालं
सोशल मीडियाच्या माध्यमातून वरुणनं त्याचा राग व्यक्त केला
मुंबई : अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सहसा त्याच्या मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखला जातो. सोशल मीडियावरही तो बऱ्यापैकी सक्रिय असतो. वरुण सहसा त्याच्या चांगुलपणासाठीच ओळखला जात असतानाच, आता एक असं वळण आलं आहे जिथं त्याचा संतप्त स्वभाव समोर आला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून वरुणनं त्याचा राग व्यक्त केला आहे. यामागे एक कारणंही आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच्या अंतर्गत सध्या शासनानं काही गोष्टींमध्ये शिथिलता आणली असली, तरीही मंदिरं, नाट्यगृह, सिनेमागृह मात्र बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कलाविश्वातून सिनेमा आणि नाट्यगृह बंद ठेवण्याच्या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यातच वरुण धवननं मुंबईचं पालटलेलं चित्र पाहून आणि कोरोना नियमांचं होणारं उल्लंघन पाहून सर्वकारी सुरु होतंय मग चित्रपटगृहच बंद का, अशा आशयाची एक पोस्ट केली आहे.
इन्स्टाग्रामवर त्यानं एक पोस्ट शेअर करत शहरातीव वाहतूक कोंडी दाखवून दिली आहे. त्याचवेळी त्यानं चित्रपटगृह बंद असण्यावर संतापवजा नाराजी व्यक्त केली आहे. एक कलाकार म्हणून चित्रपटगृहाचं महत्त्वं जाणणाऱ्या वरुणची कळवल या पोस्टमुळं सर्वांसमोर आली आहे.