Sholay : हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर असे काही चित्रपट साकारले गेले ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरुपी छाप पाडली. काही चित्रपट प्रदर्शनानंतर प्रचंड लोकप्रियता मिळवतात तर, काही चित्रपटातील कलाकारच त्याच्या लोकप्रियतेचं मोठं आणि तितकंच महत्त्वाचं कारण ठरतात. याच यादीतला एक चित्रपट म्हणजे 'शोले'. (Ramesh Sippi) रमेस सिप्पी यांचं दिग्दर्शन, सलीम- जावेद यांचे संवाद, (Amitabh Bachchan) अमिताभ बत्तन, धर्मेंद्र (Dharmendra), अमजद खान, संजीव कुमार, जया बच्चन, हेमा मालिनी, असरानी या आणि अशा अनेक कलाकारांच्या अभिनयानं या चित्रपटातील प्रत्येक पात्र जीवंत केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा चित्रपट इतका गाजला, की चाहत्यांना आजही त्यातील प्रत्येक दृश्य लक्षात आहे. 'तुम्हारा नाम क्या है बसंती....' असं विचारत भाबड्या पण, तरीही निर्भीड बसंतीला प्रश्न करणारा 'वीरु' असो किंवा मग 'अंग्रेजों के जमाने के जेलर' म्हणणारे असरानी असो. या चित्रपटात जितकी चर्चा प्रमुख पात्रांची झाली तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त चर्चा झाली ती म्हणजे सहाय्यक कलाकारांची. 


अशा या 'शोले' चित्रपटामधील आणखी एक गाजलेलं पात्र म्हणजे 'ठाकूर'. अभिनेते संजीव कुमार यांनी या चित्रपटात हे पात्र साकारलं. पण मुळात ते त्यांच्यासाठी लिहिलंच गेलं नव्हतं. संहितेनुसार सांगावं तर, संजीव कुमार यांच्यासाठी 'गब्बर'चं पात्र लिहिण्यात आलं होतं. पण, इतकी हिंसा आणि या भूमिकेची गडद बाजू हा त्यांचा पिंड नसल्यामुळं अखेर 'ठाकूर'त्यांच्या वाट्याला आला आणि त्यांनी तितक्याच प्रभावीपणे तो निभावलासुद्धा. 


हेसुद्धा वाचा : घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान, Ranveer Singh नं शेअर केली दीपिकासोबतची खास पोस्ट!


अनुपमा चोप्रा यांच्या Sholay: The Making of a Classic या पुस्तकामध्ये 'शोले'च्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा लिहिण्यात आला आहे. ज्यामध्ये चित्रपटाच्या अखेरच्या दृश्याच्या चित्रीकरणाची आठवण जागी केली. 


आठवतोय का Last Scene? 


Sholay च्या अखेरच्या दृश्यामध्ये जेव्हा 'जय'ला (अमिताभ बच्चन) आणि राधा म्हणजेच जया बच्चन या कोलमडतात तेव्हा सेटवर अनेकजण भावूक झाले. त्याचवेळी 'ठाकूर' म्हणजेच संजीव कुमार मात्र आपल्याला हात नसल्याचं विसरूनच गेले. असं म्हणतात की, ते रमेश सिप्पी यांच्याकडे गेले आणि म्हणाले, 'मी राधाला पाहू शकतोय, ती कोलमडलीये. एकिकडे तिनं माझ्या मुलाशी लग्न केलं, त्यानंतर मी तिचं लग्न जयशी लावत होतो आणि आता ही घटना.... (जयचा मृत्यू) मला तिच्यासाठी फारच वाईट वाटतंय, मी तिला मिठी मारून तिचं सांत्वन करु शकतो का?' इथं इतक्या गंभीर दृश्याचं चित्रीकरण सुरुये आणि तिथं संजीव कुमार यांचा हा प्रश्न समोर आल्याचं पाहून रमेश सिप्पी यांनी चमत्कारिक प्रतिक्रिया देत कसली मिठी? हात नाहीत ना तुमचे... असं उत्तर दिलं आणि तिथं काहींना हसूही आलं. 'शोले'ची ही आठवण तुम्हालाही हसवून गेली ना?