घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान, Ranveer Singh नं शेअर केली दीपिकासोबतची खास पोस्ट!

Ranveer Singh and Deepika Padukone : दीपिका पदुकोणनं पती रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्तानं कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. त्यामुळे तिनं सोशल मीडियावर पोस्ट का शेअर केली नाही यावर अनेकांनी प्रश्न विचारला मात्र, त्यांना त्यांचं आयुष्य प्रायव्हेट ठेवायचं असून ते एकत्र आनंदी आहेत हे स्पष्ट झालं आहे.

दिक्षा पाटील | Updated: Jul 10, 2023, 12:35 PM IST
घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान, Ranveer Singh नं शेअर केली दीपिकासोबतची खास पोस्ट!  title=
(Photo Credit : Social Media)

Ranveer Singh and Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण हे दोघेही चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. रणवीरच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दीपिकानं कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. त्यामुळे त्या दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्या दोघांच्या वैवाहिक जीवनात काही ठीक नाही असं देखील म्हटले जात होते. इतकंच नाही तर त्या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चां सुरु झाल्या. या सगळ्यात रणवीर सिंगनं आता एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीजियावर व्हायरल झाली आहे. रणवीरची ही पोस्ट पाहून त्याच्या आणि दीपिकाच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. 

रणवीरनं ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रणवीर आणि दीपिका नावेत असल्याचे दिसत आहे. इतकंच नाही तर या सुंदर अशा प्रवासाचा आनंद घेत असल्याचा हा ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहे. रणवीरनं कॅप्शन दिलं की वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. रणवीरनं ही स्टोरी काल म्हणजेच 9 जुलै रोजी शेअर केली आहे. खरंतर त्या दोघांना एकत्र पाहून हे स्पष्ट झालं आहे की हे ते दोघं आनंदी आहेत. इतकंच काय तर रणवीरनं काहीही न बोलता या सगळ्या अफवांवर फुलस्पॉट लावलं आहे. 

Ranveer Singh shares photo with wife Deepika Padukone over divorce rumors

रणवीर आणि दीपिकाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दीपिका आणि रणवीर अलिबागवरून परत आल्याचे म्हटले जातं आहे. दीपिका आणि रणवीर त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अलिबागला गेल्याचे म्हटले जात होते. व्हिडीओत ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर रणवीर होता तर मागच्या सीटवर दीपिका. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणवीर आणि दीपिकाविषयी बोलायचे झाले तर ते दोघं बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2018 साली लग्न बंधनात अडकले होते. रणवीरच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझामी हे कलाकार दिसणार आहेत. तर दीपिका लवकरच 'प्रोजेक्ट के' आणि 'फायटर' या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे.  'प्रोजेक्ट के' मध्ये दीपिका ही प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तर  'फायटर' या चित्रपटात ती हृतिक रोशन सोबत दिसणार आहे.