मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या कोणता विषय सर्वाधिक चर्चेत असेल, तर की म्हणजे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची. बॉलिवूडची ही जोडी प्रेमात पडली कधी आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला कधी याचंच सर्वांना आश्चर्य. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकी आणि कतरिनानं त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली, तरीही सूत्रांच्या माहितीनुसार 9 डिसेंबरला हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. 


राजस्थानातील जयपूरमध्ये ही सेलिब्रिटी एका आलिशान आणि ऐतिहासिक ठिकाणी लग्नगाठ बांधेल. 


लग्नानंतर त्यांचा मुक्काम एका अतिशय महागड्या हॉटेलमध्ये असणार आहे. 


सवाई माधोपूरमधील सिक्स सेंस फोर्ट बरवाडात हा विवाहसोहळा होणार आहे, जिथं ही दोघं सर्वात महागड्या खोलीत थांबतील. 


हॉटेलमधील सर्वात आलिशान आणि महागड्या अशा या खोलीसाठी ही जोडी तब्बल 7 लाख रुपये मोजणार आहे. ही किंमत इतकी आहे की, एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या जवळपास पाच ते सात बाईक यात खरेदी करता येतील. 


स्वीटमध्ये एक प्रायव्हेट गार्डन, स्विमिंग पूल असणार आहे. इथून अरावली रेंजचं दृश्यही दिसणार आहे. 


विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नामुळं या ठिकाणी सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. 


ही जोडी लग्नासाठी 6 डिसेंबरला इथं पोहोचणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


हॉटेल ठरलं, पाहुण्यांना आमंत्रणं गेली, फ्लाईट्सच्या तिकीटी बुक झाल्या आता फक्त उत्सुकता आहे ती म्हणजे विकी आणि कतरिना यांना एका दाम्पत्याच्या रुपात एकत्र पाहण्याची.