चित्रपटात एकत्र झळकलं नसतानाही विकी- कतरिनाची भेट झाली तरी कशी?
व्हिडीओ आता होतोय व्हायरल...
मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या नात्याची सुरुवात नेमकी केव्हा झाली हाच प्रश्न आताही चाहत्यांच्या मनात घर करत आहे. 9 डिसेंबरला विकी आणि कतरिना विवाहबंधनात अडकणार आहेत. कुटुंबीय आणि काही खास मित्रांची या क्षणाला उपस्थिती असणार आहे.
अशातच आता कॅट आणि विकीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हारल होत आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना आणि विकीच्या बोलण्यातून त्यांनी एकमेकांना केव्हाच पसंती दिली असल्याचं स्पष्ट होत आहे.
आता तुम्हीही म्हणाल की हे सर्व नेमकं केव्हा आणि कुठे झालं....?आपल्याला हे कळालंही नाही...?
तर, 2019 मध्ये करण जोहरनं त्याच्या एका कार्यक्रमात कतरिनाला तुला येत्या काळात कोणासोबत चित्रपटात काम करायला आवडेल असा प्रश्न विचारला होता.
कतरिनानं त्यावेळी थेट विकी कौशल याचं नाव घेतलं होतं. त्यानंतर जेव्हा विकी आणि आयुष्मान करणच्या शोवर आले त्यावेळी त्यानं कतरिनाच्या मनातील गोष्ट विकीला बोलून दाखवली.
हे ऐकून विकी जागेवरच पडला. विकी आणि कतरिना पहिल्यांदाच एका मुलाखतीच्या निमित्तानं एकत्र आले होते. ही त्यांची प्रत्यक्ष स्वरुपातील पहिलीच भेट होती असं म्हटलं जातं. मुळात विकी आणि कतरिनाची केमिस्ट्री या मुलाखतीतही पाहायला मिळाली होती.