नवी दिल्ली : चीनमध्ये शुक्रवारी अभिनेत्री श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट 'मॉम' प्रदर्शित करण्यात आला. यावेळी श्रीदेवीचे पती आणि निर्माते बोनी कपूर अतिशय भावुक झाले असून त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. बोनी कपूर यांनी शुक्रवारी ट्विट करत 'आज चीनमध्ये मॉम चित्रपट प्रदर्शित झाला. माझ्यासाठी हा अतिशय भावनिक क्षण आहे. श्रीचा शेवटचा चित्रपट अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी झी स्टुडिओचा आभारी आहे. मला आशा आहे की चीनमध्ये लोक या चित्रपटाशी जोडले जातील.' असं त्यांनी म्हटलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मॉम' चित्रपटाचे दिग्दर्शक रवि उदयवर यांनी श्रीदेवी यांना चित्रपटातून एका आईच्या भूमिकेत दाखवले आहे. ही आई तिच्या सावत्र मुलीला न्याय देण्यासाठी एका नव्या प्रवासाची सुरुवात करते. मुलीची भूमिका पाकिस्तानी अभिनेत्री सजल अलीने साकारली आहे. 


'मॉम' चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी श्रीदेवी यांना त्यांच्या मरणोत्तर सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. हा चित्रपट याआधी ४० भागात प्रदर्शित करण्यात आला आहे. पोलंड, रुस, ब्रिटेन, अमेरिका, सिंगापूरमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे. 



बोनी कपूर हिंदी चित्रपट 'पिंक'चा तमिळ रिमेक बनवणार आहेत. रिमेकचं नाव 'एके५९' आहे. चित्रपटात सुपरस्टार अजीत प्रमुख भूमिकेत दिसणार असून सध्या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे.