नवी दिल्ली : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर पती बोनी कपूर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ट्विट केलेल्या पत्रात त्यांनी सर्व चाहत्यांचे, शुभचितकांचे आणि मीडियाचे आभार मानले.


काय म्हणाले बोनी कपूर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, आता मुलींचे संगोपन ही एकमेव चिंता मला आहे. आता श्री शिवाय मला त्यांना वाढवायचे आहे. श्री आमच्या जगण्याचे, हसण्याचे कारण होती.


पद्मश्री विजेती अभिनेत्री श्रीदेवीवर बुधवारी शासकीय इमामात अंतिम संस्कार करण्यात आले. तसंच श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन कपूर आणि अंशुला माझ्या आणि जान्हवी, खुशीच्या मागे उभे राहिले त्यांचा मी आभारी आहे, असेही ते म्हणाले. आम्ही एकत्रितपणे या घटनेला सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहोत.


उत्तम कलाकार


श्रीदेवी एक उत्तम कलाकार असून तिच्यासारखी कलाकार होणे शक्य नसल्याचेही ते म्हणाले.  हिंदीसोबतच तेलगु, कन्नड आणि मल्याळम सिनेमात श्रीदेवीने काम केले आहे. मॉम हा तिचा शेवटचा सिनेमा ठरला.