Book My Show CEO Ashish Hemrajani Total Networth : बूक माय शोचे सीईओ आणि को-फाउंडर आशीष हेमराजानीला मुंबई पोलिसांनी समन्स बजावलं आहे. बूक माय शो हे ऑनलाइन तिकिट विक्रीचं एक प्लॅटफॉर्म आहे. आशीषला हे समन्स तिकिटांच्या काळाबाजारी करण्याच्या आरोपांवरून करण्यात आलं आहे. आशीषवर आरोप आहे की त्यानं पुढच्या वर्षी होणाऱ्या 'कोल्डप्ले कॉन्सर्ट' चे तिकिटं महाग विकले आहेत. आशीष अब्जोपती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात कोल्डप्ले बॅंड मुंबईमध्ये परफॉर्म करणार आहे. त्यासाठी बूक माय शोवर तिकिटांची विक्री सुरु झाली आहे. वकील अमित व्यासनं या कॉन्सर्टसाठी बूक माय शोवर काळाबाजारी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात अमितनं गुरुवारी आर्थिक गुन्हे विभागात तक्रार दाखल केली होती. तिकिटांची किंमत ही 30 ते 50 टक्के जास्त किंमतीत विकण्यात आलं. त्यावर हे देखील आरोप करण्यात आले की 2500 रुपयाचं तिकिट एक लाख रुपयांमध्ये विकण्यात आलं. 


आशीषला बूक माय शोची आयडिया तो जेव्हा एका झाडाच्या खाली बसलेला होता तेव्हा आली होती. खरंतर, दोन वर्ष एक जॉब केल्यानंतर तो एक ब्रेक घेऊन सुट्टीसाठी दक्षिण आफ्रिकेत गेला होता. त्यावेळी एका झाडा खाली बसलेला असताना रेडियोवर एक प्रोग्राम ऐकत होता. त्या प्रोग्राममध्ये त्यानं रग्बी खेळाची तिकीटांची जाहिरात ऐकली. त्याला तिथे आयड्या आली की असं काही चित्रपटांच्या तिकिटांसाठी करण्यात यावं. भारतात परतण्याआधी त्याचा संपूर्ण प्लॅन तयार होता. 


आशीषनं दोन मित्रांसोबत मिळून 1999 मध्ये बिग ट्री एन्टरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावानं एक कंपनी सुरु केली. या वेळी इंटरनेट सगळ्यांपर्यंत पोहोचलं नव्हतं. स्मार्टफोन तर तेव्हा नव्हतेच. ऑनलाइन पेमेंटसाठी कोणतंही अॅप्लीकेशन नव्हतं. अशात आशीषसमोर अनेक अडचणी आल्या होत्या. काही काळानंतर कंपनीचं नाव बजलून गो फॉर टिकिटिंग असं ठेवण्यात आलं. त्यावेळी डॉट कॉम इंडस्ट्री चांगलीच चर्चेत होती. अशात जेपी मोर्गन चेस नं गो फॉर टिकिटिंग नावाचे सगळे शेअर्स हे न्यूज कॉर्पोरेशनला विकले. आता कंपनीचं ब्रॅंड नेम हे इंडिया टिकिटिंग झालं होतं. 


2002 मध्ये एक असा काळ आला जेव्हा डॉट कॉम इंडस्ट्रीचं संपूर्ण मार्केट हे क्रॅश झालं. त्याचा परिणाम आशीषच्या कंपनीवर देखील झाला. 150 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या या कंपनीमध्ये फक्त 6 लोक राहिले होते. अशी वेळ आली की कंपनी बंद करावी लागते की काय. अनेक शहरांमध्ये सुरु झालेल्या कॉल सेंटर्सला बंद करण्यात आलं.


हेही वाचा : महेश बाबूसोबत लग्न करण्याआधी नम्रता शिरोडकरनं बंगल्यात नाही तर अपार्टमेंटमध्ये राहण्याची ठेवली होती अट! जाणून घ्या कारण


2006 मध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आलं आणि कंपनीचा फायदा झाला कारण थिएटरमध्ये लोक मोठ्या संख्येनं जाऊ लागले. ते पाहता 2007 मध्ये त्यानं कंपनीचं ब्रॅंड नेम बदलून 'बुक माय शो' केलं. 2011 मध्ये कंपनी खूप मोठी झाली आणि कंपनीचा रेव्हेन्यू हा 16 कोटी झाला. त्यानंतर आशीषनं मागे वळून पाहिलं नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशीषची नेटवर्थ ही 3 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. तर कंपनी बूक माय शोचं व्हॅल्युएशन हे 7500 कोटी असल्याचं म्हटलं जातं.