`तुझ्या नवऱ्याला एका दिवसासाठी मला दे`; सूर्याच्या चाहतीची मागणी ऐकताच पत्नी ज्योतिकाने दिलं `असं` उत्तर
Suriya-Jyothika : सूर्या आणि ज्योतिका यांचे आज लाखो चाहते आहेत. तर या सगळ्यात सूर्याच्या चाहतीनं ज्योतिकाकडे केली विचित्र मागणी...
Suriya-Jyothika : दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका आणि सूर्या यांची जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. दोघांच्या लग्नाला आज 18 वर्ष पूर्ण झाली आणि आजही ते आनंदी राहतात. ते दोघे त्यांच्या करिअरमध्ये व्यस्त असले तरी कुटुंबासाठी वेळ काढतात. त्याशिवाय ते दोघे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ज्योतिका आणि सूर्या नेहमीच चाहत्यांसोबत इन्टरॅक्ट करतात. अनेकदा ते त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या विचित्र प्रश्नांची देखील उत्तर देताना दिसतात. आता देखील एका चाहतीनं ज्योतिकाकडे विचित्र डिमांड केली आहे. त्यावर ज्योतिकानं हटके उत्तर दिलं आहे.
ज्योतिकानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत ज्योतिकानं शैतान या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले. तर त्यातील काही फोटोत सूर्या देखील आहे. हे सगळे फोटो शेअर करत ज्योतिकानं संपूर्ण टीमचे आभार मानले. तर सूर्याला पाहून त्याच्या एका चाहतीनं कमेंट करत ज्योतिकाकडे एक मागणी केली आहे. ती चाहती ज्योतिकाला म्हणाली की ती एक दिवसासाठी तिचा नवरा सूर्याला तिला देऊ शकते का? त्यावर ज्योतिकानं मजेशीर उत्तर दिलं आहे. काय म्हणाली सूर्याची चाहती, "ज्योतिका मॅम, तुम्ही फक्त एका दिवसासाठी सूर्या सरांना मला देऊ शकता का? जसं तुम्ही SOK (Sillunu Oru Kaadhal) चित्रपटात तुम्ही ऐशूसाठी केलं. मी गेल्या 15 वर्षांपासून या जेन्टलमॅनची चाहती आहे."
चाहतीची ही कमेंट पाहताच ज्योतिकानं तिला रिप्लाय देत म्हणटलं की 'उप्स, याची परवानगी नाही.' ज्योतिकाचं तिच्या नवऱ्यासाठी असलेलं पजेसिव्हनेस पाहिल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिनं उत्तर दिलं हे पाहून त्या चाहतीचा आनंद गगनात मावेना असा झाला. तर ज्योतिकाला उत्तर देत ती चाहती म्हणाली, "ज्योतिका मॅम सूर्या सर फक्त तुमचेच आहेत."
ज्योतिका आणि सूर्या विषयी बोलायचे झाले तर त्यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्रीही फार चांगली आहे. त्यामुळेच हळू-हळू ते दोघं एकत्र आले. सूर्या आणि ज्योतिकानं तिच्या घरच्यांचा आशीर्वाद घेत 2006 मध्ये लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि मुलगी. तर त्या दोघांच्या करिअरसाठी सूर्या आणि ज्योतिका गेल्यावर्षी मुंबईत शिफ्ट झाले आणि सध्या मुंबईतच राहत आहेत.