बहिणीचा हार्ट अटॅकने मृत्यू, मृतदेह पाहून भावानेही सोडला जीव; अभिनेत्याच्या घरावर शोककळा
Bose Venkat Lost his Sister and Brother on same day : या तमिळ अभिनेत्यानं एकाच दिवशी गमावलं बहीण आणि भावाला... बोस यांच्या भावाला बहिणीच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही आणि त्याचे ही हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले.
Bose Venkat Lost his Sister and Brother on same day : तमिळ चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक बोस वेंकट यांना आपल्यावर दु:खाचा एवढा मोठा डोंगर तुटून पडला आहे. त्यांचा भाऊ आणि बहिणी दोघांचेही एकाच दिवशी निधन झाले आहे. त्या दोघांचा एकाच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. सगळ्यात आधी बोस वेंकट यांच्या बहिणीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्याच्या भावाला हृदयविकाराचा झटका आला. अचानक असं झाल्यानं ते स्वत: ला सावरु शकले नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रिपोर्ट्सनुसार, बोस वेंकट यांच्या बहिणीला शुक्रवारी 23 जून रोजी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीनं कुटुंबातील सगळ्यांना धक्का बसला. तर त्यांचा भाऊ रंगनाथनला बहिणीच्या निधनाचा खूप मोठा धक्का बसला की हे तो सहन करू शकला नाही. तर बहिणीचा मृतदेह पाहून तो बेशुद्ध झाला आणि त्याचवेळी त्याचा हृदयविकाराचा झटका आहे. त्याच क्षण त्याचेही निधन झाले. त्या दोघांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला हे सहन करण अशक्य झालं आहे. सगळ्यांची अवस्था खूप बिकट आहे. तर बोस वेंकटचे चाहते त्याला या कठीण प्रसंगी देवाची साथ मिळावी ही प्रार्थना करत आहेत. तर त्याच्या अनेक चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. बोस वेंकटनं त्याच्या बहिणीच्या निधनानंतर इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत तिचे निधन झाल्याची बातमी चाहत्यांना दिली होती.
बोस वेंकट विषयी बोलायचे झाले तर त्यानं फक्त तमिळ चित्रपटसृष्टीत नाही तर मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. तो एक डबिंग आर्टिस्ट देखील आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. वयाच्या 17 व्या वर्षी बोस वेंकट चेन्नई आले होते. यावेळी चेन्नईला त्याचं येण्याचं कारण हे अभिनेता होणं हेच होतं. पण जेव्हा चित्रपटांमध्ये त्यांना यश मिळालं नाही, तेव्हा तो रिक्षा चालवू लागला. त्यासोबत तो अभिनयासाठी ऑडिशन देखील देऊ लागला होता. त्यानंतर त्याला तमिळ मालिका Metti Oli मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून त्याच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात झाली.
हेही वाचा : पुण्यात कार्यक्रमासाठी गेलेली मुग्धा प्रथमेशला करतेय मिस! फोटो शेअर करत म्हणाली...
दरम्यान, चित्रपट निर्माते कुलजीत पाल यांचे काल 24 जून रोजी निधन झाले. अनेक दिवसांपासून ते आजारी असून त्यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचे निधन झाले.