Munawar Faruqui on winning Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' चा विजेता झाल्यानंतर मुनव्वर फारुकीचा आनंद सातव्या आसमानावर आहे. मुनव्वर फारुकीला त्याचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. या सगळ्यात त्यानं एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं त्याच्या विजयावर आणि शोमधील त्याच्या उतार चढावावर वक्तव्य केलं आहे. त्यासोबत कठीण प्रसंगांचा आणि चाहत्यांना तोंड देण्यावर वक्तव्य केलं. त्याशिवाय 50 लाख रुपयांचा तो काय करणार हे सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुनव्वरनं नुकतीच 'नवभारत टाईम्स'ला मुलाखत दिली यात भारतातील सगळ्या मोठा रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर काय भावना आहे. 'जर मी हे सांगायला बसलो तर सकाळ होईल. तर शोच्या शेवटपर्यंत मला वाटतं नव्हतं की जिंकणार. मी नंतर फक्त 50 टक्के शक्यता आहे असा विचार करत होतो. मी अभिषेकचा प्रवास पाहिला आहे आणि त्यानं देखील कठीण परिस्थिती पाहिले आहे. मला त्याच्यासाठी वाईट वाटतंय. त्यानं शोमध्ये खूप काही केलं', असं मुनव्वर म्हणाला. 



मुनव्वरला पुढे ट्रॉफी तर जिंकली पण इज्जत गमावलीस यावर काय म्हणशील असं विचारलं. तेव्हा तो म्हणाला, 'ज्यांनी मला जिंकवलं, त्यांचे आभार. कुठे ना कुठे मी जे काही केलं त्यावरून मी काय विचार करतो हे कळतं. माझा पुढचा जो प्रवास आहे. तो खूप कठीण असणार आहे. मात्र, मी सगळं काही फेस करण्यासाठी तयार आहे. पण, माझं जे काम आहे, मी एक माणूस आहे, लोक जसं बोलतात तसा मी नाही, मला हसू येतं. मी ज्या महिलांसोबत होतो, त्यांना माहितीये की मी कसा आहे. मी आता इथे सगळ्यांसमोर आहे. मला जेही प्रश्न विचारतील, मी सगळ्यांचं उत्तर देईन.' 


हेही वाचा : 'त्या काकांचा हात माझ्या तोंडावर होता आणि...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा वयाच्या 9 व्या वर्षी झाला विनयभंग


दरम्यान, मुनव्वर फारूकीला शोचं विजेता घोषित करण्यात आलं. अभिषेक कुमार रनर-अप ठरला, मन्नारा चोप्रा दुसरी रनर-अप ठरली.  अंकिताला चौथं स्थान मिळालं आणि यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. कारण तिच्या जिंकण्याची सगळ्यांना आशा होती. अरुण माशेट्टी पाच फायनलिस्टमधून बाहेर होणारा पहिला स्पर्धक ठरला होता.