मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर 'थप्पड' चित्रपट शुक्रवारी रूपेरी पडद्यावर दाखल झाला. पतीने कानाखाली मारल्यानंतर तापसी कशाप्रकारे त्याच्यापासून विभक्त होण्याच्या निर्णय घेते हे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने योग्य प्रकारे केला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार कमाई केले नाही. मात्र दुसऱ्या दिवशी 'थप्पड' चित्रपटाने बऱ्यापैकी गल्ला जमवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाचे कौतुक समिक्षकांनी भरभरून केलं. तर हा चित्रपट आता किती रूपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे चित्रपट विश्लेशक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहेत.



प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने फक्त ३.७ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी चित्रपटाने ५.५ रूपयांपर्यंत मजल मारली. दोन दिवसात चित्रपटाने ८.१२ कोटींचा गल्ला जमा केला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी चित्रपट प्रेक्षकांचे किती प्रमाणात मनोरंजन करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


२२ कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट साकारण्यात आला आहे. भारतात एकूण २ हजार ३०० मोठ्या पडद्यांवर  'थप्पड' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे.