मुंबई : सध्या अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर '83' सिनेमाची तुफान चर्चा रंगत आहे. सिनेमा क्रिकेटवर आधारित असल्यामुळे अनेकांच्या मनात सिनेमाबद्दल उत्सुकता होती. 24 डिसेंबर रोजी सिनेमा रूपेरी पडद्यावर दाखल झाला. पहिल्या दिवशी सिनेमाने समाधानकारक कमाई केली, पण ख्रिसमसच्या दिवशी सिनेमा हवी तेवढी कमाई करण्यात अपयशी ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिसमसच्या दिवशी या चित्रपटाने उत्कृष्ट कामगिरी करण्याची अपेक्षा होती. बॉक्स ऑफिस इंडियाच्या वेबसाईटनुसार, दुसऱ्या दिवशी 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली असून जवळपास 16 कोटींची कमाई झाली आहे. अशा प्रकारे सिनेमाने दोन दिवसांत 28 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत सिनेमा किती कोटींपर्यंत मजल मारतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



रणवीर सिंग स्टारर सिनेमाची कथा 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषकावर आधारित आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 12.64 कोटींची कमाई केली. मल्टिप्लेक्समध्ये सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, पण छोट्या शहरांमध्ये हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगण्यात येत आहे. 


शनिवारी ख्रिसमसची सुट्टी असल्याने '83'च्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा होती पण तसे झाले नाही. 'स्पायडर मॅन: नो वे होम' आणि 'पुष्पा' हे दोन सिनेमे सध्या थिएटरमध्ये आहेत. या दोन्ही सिनेमांचा दुसरा आठवडा असूनही त्यांचे कलेक्शन चांगलेच झाले आहे.