मुंबई : गेल्यावर्षभरात अभिनेता आयुष्मान खुरानाने प्रेक्षकांची अशी पसंती मिळवली आहे की त्याचा कोणताही अंदाज पडद्यावर हिट होत आहे. एवढंच नव्हे तर दर्शकांसोबतच आता बॉक्स ऑफिसवर देखील त्याची जादू चालत आहे. 'ड्रीम गर्ल' बनून आलेल्या अभिनेता आयुष्मान खुरानाने आतापर्यंतचा सर्वात मोठा वीकेंड कलेक्शन कमावलं आहे. आतादेखील आयुष्मानचा हा सिनेमा जबरदस्त कलेक्शन करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केल आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, शुक्रवारी १०.०५ करोड, शनिवारी १६.४२ करोड रुपये, रविवारी १८.१० करोड रुपये तर सोमवारी ७.४३ करोड रुपयांच कलेक्शन केलेलं आहे. तसेच मंगळवारी सिनेमाने स्वतःला स्टेबल ठेवत ७.४० करोड रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाची एकूण कमाई ५९.४० करोड रुपये इतकी आहे. 



आपल्या सिनेमांमधून सोशल मॅसेज देणाऱ्या अभिनेता आयुष्मानच्या या सिनेमाला देखील चांगलीच पसंती मिळत आहे. महत्वाचं म्हणजे ड्रीम गर्लने आतापर्यंत आयुष्मानचेच सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. आतापर्यंतचा आयुष्मानच्या सिनेमांचा रेकॉर्ड पाहता हा सिनेमा पुन्हा एकदा वीकेंडला चांगली कमाई करणार आहे. 


हा सिनेमा आयुष्मान खुरानाचा सर्वात मोठी ओपनिंग तसेच बिगेस्ट विकेंड करणारा ठरला आहे. २०१७ मध्ये 'बरेली की बर्फी'ने ११.५२ करोड, २०१७ मध्ये 'शुभ मंगल सावधान'ने १४.४६ करोड रुपयांची कमाई केली होती. तर २०१८ मध्ये 'अंधाधुन' या सिनेमाने १५ करोड रुपयांची कमाई केली आहे. २०१९ मध्ये 'आर्टिकल १५' सिनेमाने २०.०४ करोड रुपयांची कमाई केली आहे. २०१८ मध्ये 'बधाई हो' सिनेमाने ४५.७० करोड रुपयांची कमाई केली. तर आता 'ड्रीम गर्ल' ने ४४.५७ करोड रुपयांच करत सर्वांना मागे टाकलं आहे.