मुंबई : 'वे उस किताब की नहीं चलने देते, जिसकी ये शपथ लेते हैं...' असं म्हणत चित्रपट 'आर्टीकल १५' रूपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. समिक्षकांनी त्याचप्रमाणे प्रेक्षकांनीदेखील चित्रपटाच्या कथेचे आणि भूमिकांचे कौतुक केले आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास पाच कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित चित्रपटात आयुषमानसोबतच ईशा तलवार, मनोज पहवा, सयानी गुप्ता, कुमूद मिश्रा आणि मोहम्मद जिशान या कलाकारांनी भूमिका साकारली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा गौरव सोलंकी यांनी लिहली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाची कथा २०१४ मध्ये उत्तर प्रदेशच्या बदायू येथे झालेल्या सामूहिक बलात्कारावर आधारलेली आहे. या घटनेनंतर देशात एकच खळबळ उडाली होती. धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर होणारा भेदभाव 'आर्टिकल-१५' या चित्रपटात खुबीनं रेखाटण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केला. 


या चित्रपटात पहिल्यांदाच आयुषमान पोलिसाच्या भूमिकेत दिसतोय. आपली जात सर्वात श्रेष्ठ समजणाऱ्या जाणाऱ्या उच्चवर्णीयांमुळे समाजात पसरलेली असमानता, धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यांमध्ये होणारा भेदभाव इत्यादी विषयांभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे.