Avengers: Endgame : बॉक्स ऑफिस विक्रमाचा ENDGAME, `ऍव्हेंजर्स`ची कमाई पोहोचली...
बच्चे कपंनीपासून ते मोठ्यांच्या मनात `Avengers: Endgame` चित्रपटाने अधिराज्य गाजवले आहे.
मुंबई : सध्या संपूर्ण देशातील कलाविश्वात फक्त 'Avengers: Endgame' या चित्रपटाची चर्चा रंगलेली आहे. बच्चे कपंनीपासून ते मोठ्यांच्या मनात 'Avengers: Endgame' चित्रपटाने अधिराज्य गाजवले आहे. चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होवून फक्त दहा दिवस झाले आहेत. चित्रपट प्रदर्शित होताच फक्त दोन दिवसांत १०० को़टींचा पल्ला पार केला आहे. तर या अठवड्यात चित्रपट ३७५ कोटी रूपयांच्या घरात मजल मारू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सनडे फनडे म्हणूण साजरा करत प्रक्षकांची पाऊले चित्रपटगृहांकडे वळताना दिसली. रविवारी चित्रपटाने २१.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. फक्त परदेशातच नव्हे, तर भारतातही या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यापासून चित्रपटाविषयीच्या पोस्ट पर्यंत प्रत्येक गोष्टीत प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद पाहायला मिळाला.
एस.एस.राजमौली दिग्दर्शित 'बाहुबली २' चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला आहे. 'Avengers: Endgame' मागील अठवड्यात २६ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाने आतापर्यंत ३११ कोटी रूपयांचा गल्ला जमावला आहे.बऱ्याच दिवसांपासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याविषयीचीच उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळाली होती. आता हा चित्रपट किती कोटींचा पल्ला गाठतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता हे सारंकही अद्वितीय असल्याचीच प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. येत्या काळातही Avengers: Endgame ची जादू कायम राहिली तर, बॉलिवूडच्या इतर चित्रपटांना याचा फटका बसू शकतो हे मात्र नक्की.