कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेजमध्ये नेमका काय फरक असतो? 99 टक्के लोक सांगू शकणार नाहीत

Court Marriage And Marriage Registration : सध्या सर्वत्र लग्न समारंभाची धामधूम सुरु आहे.  विवाहाचा शुभ मुहूर्त पाहून अनेक जोडपी लग्नबंधनात अडकतायत. काहीजणांना लग्न धामधुमीत करण्याची हौस असते तर काही अतिशय साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करून विवाह करतात. अनेकदा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणारी जोडपी धार्मिक पद्धतीने विवाह करण्यापेक्षा कायदेशीर पद्धतीने विवाह करण्यास प्राधान्य देतात. 

| Dec 04, 2024, 17:36 PM IST
1/7

1954 पासून विशेष विवाह कायदा म्हणजेच स्पेशल मॅरेज अॅक्ट भारतीय न्यायलयानं लागू केला आहे. यानुसार कुठल्याही जाती, धर्म आणि संस्कृतीतील व्यक्ती एकमेकांशी लग्न करू शकतात. याकरता जोडपी जवळच्या विवाह निबंधक कार्यालयात विवाह प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात. 

2/7

बऱ्याचवेळा तुम्ही कोर्ट मॅरेज किंवा रजिस्टर मॅरेज हे शब्द ऐकले असतील. अनेकांना हे दोन्ही गोष्टी एकसारख्याच वाटत असतील, पण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. कोर्ट मॅरेज म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही पद्धतीने लग्न केले नसेल अशावेळी तुम्ही कोर्ट मॅरेज करू शकता. यात मॅरेज ऑफिसरच्या साक्षीने विशेष विवाह कायद्यानुसार कोर्टात कायदेशीर लग्न करू शकता.  

3/7

कोर्ट मॅरेज करण्यापूर्वी तुम्हाला अर्ज करावा लागतो. मग नोटीस निबंधकाद्वारे प्रसिद्ध केली जाते, जेणेकरून जोडप्याच्या लग्नाबाबत कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला काही अडचण असेल तर ते आक्षेप नोंदवू शकता. जर अर्ज केल्यावर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांमध्ये कोणत्याही व्यक्तीने जोडप्याच्या लग्नावर आक्षेप नोंदवला नाही तर जोडपी बिनदिक्कतपणे कोर्ट मॅरेज करू शकतात.   

4/7

कोर्ट मॅरेजचे काही नियम आहेत. यानुसार तुमच्या पहिल्या लग्नाचा कायदेशीर घटस्फोट झाला असेल तर तुम्ही दुसरं लग्न करू शकता किंवा तुमच्या जोडीदाराचा मृत्यू झाला असेल तर तुम्ही कोर्ट मॅरेज पद्धतीने दुसरा विवाह करू शकता. कोर्ट मॅरेज करण्यासाठी तीन साक्षीदार असावे लागतात. 

5/7

मॅरेज रजिस्ट्रेशन किंवा रजिस्टर मॅरेज म्हणजे तुम्ही मॅरेज रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रारकडे आपल्या विवाह नोंदणीसाठी अर्ज करू शकता. 

6/7

कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशनमध्ये मोठा फरक असतो तो म्हणजे कागदपत्र आणि प्रक्रियेचा. जर तुम्ही धार्मिक परंपरेनुसार लग्न केले असेल तर त्यानंतर तुम्हाला मॅरेज रिजेस्ट्रशनसाठी अर्ज करावा लागतो. 

7/7

कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशनमध्ये वेगवेगळ्या कागदपत्रांची गरज असते. यामध्ये मुख्यत्वे तुमचे ओळखपत्र, जन्मदाखला आणि पत्त्याची कागदपत्रे लागतात. परंतु दोन्ही प्रक्रियांमध्ये वेगवेगळ्या डॉक्यूमेंट्सची गरज असते. मॅरेज रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला एक विवाह प्रमाणपत्र मिळत ज्यामुळे तुमचं लग्न हे कायदेशीर आहे हे सिद्ध होतं.