मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ, रितेश देशमुख आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर 'बागी ३' (Baaghi 3) चित्रपटाने काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ६ मार्च रोजी चित्रपटगृहात दाखल झालेल्या 'बागी ३'ला समिक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला नसला तरी चाहत्यांनी मात्र चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. शिवाय चित्रपटाच्या कमाईचा आकडा देखील दिवसागणिक वाढताना दिसताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जवळपास १७.५० कोटींचा गल्ला पार केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच चित्रपटाने दमदार कमाई केली. तर अठवड्याच्या शेवटी 'बागी ३' चित्रपटाने ५३.८३ कोटी रूपयांपर्यंत मजल मारली आहे आणि मंगळवारपर्यंत चित्रपटाने ६२ कोटींचा गल्ला पार केला आहे. त्यामुळे आता येत्या काळात 'बागी ३' किती कोटी रूपयांची उंची गाठतो हे पाहणं मजेशीर ठरणार आहे. 


'बागी ३' संपूर्ण भारतात तब्बल ४ हजार ४०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. तर संपूर्ण जगात हा चित्रपट १ हजार १०० रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. 


कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोक सावर्जनिक ठिकाणी जाणे टाळत असल्याने बॉलिवूडला त्याचा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र, 'बागी'ने ही शक्यता धुळीस मिळवली आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांनी 'बागी ३' चित्रपटाला ब्लॉकबास्टर घोषित केले आहे.