मुंबई : सध्या रूपेरी पडद्यावर 'बागी ३' चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ६ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. प्रदर्शनानंतर काही ठिकाणी चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. एवढचं नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी 'बागी ३' चित्रपटाला ब्लॉकबास्टर देखील घोषित केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता टायगर श्रॉफ, रितेश देशमुख आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'बागी ३' बॉक्स ऑफिसवर कमालीची कमगिरी करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 



चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 'बागी ३'ने १७.५० कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे आता येत्या दिवासत हा चित्रपट किती रूपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय या चित्रपटावर कोरोना व्हायरसचा कोणताही परिणाम झाला नसल्याचं दिसून येत आहे. 


चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, रितेश देशमुख यांची मध्यवर्ती भूमिका आहे. तर अंकिता लोखंडे, विजय वर्मा, जयदीप अहलावत, जमीर खोरी आणि दानिश भट्ट देखील मुख्य भूमिकेत झळकत आहे.