मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर सिनेमा 'गली बॉय' यशाच्या शिखरावर आहे. सिनेमाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी 50 कोटी रूपयांची मजल मारली. 'गली बॉय' सिनेमाचे वारे जगभरात वाहू लागले आहे. 'आपना टाइम आयेगा' गण्याने चांगलाच जोर पकडला आहे एवढेच नाही तर सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. सिनेमाच्या कमाईचा आकडा बॉक्स ऑफिसवर दिवसोंदिवस वाढत आहे. सिनेमाने सलग पाचव्या दिवशी 75 कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेट अॅनलिस्ट तरण आदर्शने सिनेमाच्या कमाईचा आकडा ट्विटरच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर शेअर केला आहे.  



 


'गली बॉय' सिनेमा दिग्दर्शक झोया अख्तरच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सिनेमा ठरला आहे. याआधी झोया दिग्दर्शित सिनेमा 'दिल धड़कने दो' ने 76.88 कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यानंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमाने 90.27 को़टी रूपयांपर्यंत मजल मारली होती. तर या आठवड्यात 'गली बॉय' सिनेमा 100 कोटींपर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे. 


९ फेब्रुवारी रोजी 'गली बॉय' सिनेमाचा जर्मनीच्या बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रीमियर संपन्न झाला. प्रतिष्ठित बर्लिन फेस्टिवलमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला. आता येणाऱ्या दिवसांत सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती रुपयांची मजल मारतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.