मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर 'जजमेंटल हैं क्या' चित्रपटने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांच्या मनात घर केले आहे. समीक्षकांनी देखील 'जजमेंटल हैं क्या' चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोघांच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. चित्रपटाची कथा  मानसिक रोगी असलेल्या कंगनाच्या भोवती फिरताना दिसत आहे. तर राजकुमार राव तिच्या आजाराचा फायदा घेत असल्याचे चित्र चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जजमेंटल हैं क्या' चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी जवळपास ४.५० कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर शनिवारी ६ कोटींचा गल्ला पार करत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. 


तब्बल २ हजार स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आलेला 'जजमेंटल हैं क्या' चित्रपट ४० कोटींच्या बजेटमध्ये साकारण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कोवेलामुडी यांनी केले आहे. एकीकडे 'जजमेंटल हैं क्या' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला, तर दुसरीकडे त्याच दिवशी प्रदर्शित करण्यात आलेल्या 'अर्जुन पटियाला' चित्रपटाची कामगिरी समाधानकारक झालेली नही.


'अर्जुन पटियाला' चित्रपटाने फक्त १.२५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. अता येत्या काळात 'जजमेंटल हैं क्या' चित्रपट चाहत्यांचे मनोरंजन करण्यात किती यशस्वी ठरतो हे बघणं मजेशीर ठरणार आहे.