आयपीएल सामन्यांमुळे `केसरी`चा रंग उतरला
खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा स्टारर `केसरी` चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भोवला आहे.
मुंबई : खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा स्टारर 'केसरी' चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भोवला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगलीच मजल मारली आहे. चित्रपट प्रदर्शित होताच पहिले सहा दिवस कमाईचा आकडा सलग चढत्या क्रमांकावर होता. पण आता चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. आयपीएलचे सामने रंगल्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली आहे. सहा दिवसात चित्रपटाने 96 कोटींचा गल्ला जमा केला आहे.
ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटाने निर्मात्यांना निराश केल्याचे दिसत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 21.06 कोटी रूपयांचा गल्ला जमा केला. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी चित्रपटाने 16.70 कोटी, शनिवारी 18.75 कोटी, पुन्हा रविवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 21.51 कोटी रूपयांची मजल मारली. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईला उतरती कळा लागली. सोमवारी चित्रपटाने 8.25 कोटी कमवले आणि मंगळवारी 7.17 कोटींची कमाई केली.
अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली साकारण्यात आलेला सिनेमा ऐतिहासिक कथेवर आधारलेला आहे. 'केसरी' सिनेमाचे कथालेखण गिरीश कोहली आणि अनुराग सिंग यांनी केले आहे. सिनेमाची निर्मिती अनेक निर्मात्यांनी मिळून केली आहे.त्यापैंकी एक करण जोहर आहे.
१८९७ साली झालेल्या सारगढीच्या लढाईत ब्रिटीश भारतीय सेनेच्या २१ शिख जवानांनी १० हजार अफगाणी सैनिकांशी झुंज दिली होती. या सिनेमाचं कथानक लढाईत सहभागी असलेले हवालदार ईशर सिंह यांच्या शौर्यावर आधारलेलं आहे. इतिहासातील सर्वात कठीण युद्धातील हे एक युद्ध होते.