मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर 'मर्दानी २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच जोर धरला आहे. 'मर्दानी'च्या तुलनेत 'मर्दानी २ चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे वास्तव या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राणी चित्रपटात एका निर्भीड पोलीस अधिराऱ्याच्या भूमिकेत झळकत आहे. 'शिवानी शिवाजी रॉय' भूमिकेत झळकत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. #Mardaani2 ला आठवड्याच्या शेवटी चांगला प्रतिसाद मिळाला आहे असं सांगत एका चांगल्या कथानकाच्या चित्रपटाची ताकद या चित्रपटाने दाखवून दिल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.


चित्रपटाने सलग सहाव्या दिवशी २५ कोटीं रूपायांपेक्षा जास्त कमाई केली आहे. एका बलात्कार करणाऱ्या आरोपीला पडकड्यासाठी शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत झळकणारी राणी प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने भावली आहे.


#Mardaani2 हा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या Mardaani या चित्रपटाचा सिक्वल आहे. आदित्य चोप्राची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनर्स अंतर्गत करण्यात आली आहे.