मुंबई : रणबीर कपूरच्या संजू सिनेमाची कमाई थांबण्याचे नावच घेत नाही. प्रदर्शनाच्या २० व्या दिवशीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सर्व सिनेमांनी बनवलेले रेकॉर्ड्स ब्रेक करण्याठी हा सिनेमा सज्ज असल्याचे वाटते. ट्रेंड अनालिस्टनुसार, आगामी दिवसात संजूच्या कमाईला कोणताही ब्रेक लागणार नाही. कारण प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही संजू सिनेमाची कमाई सुरुच आहे.


 इतकी झाली एकूण कमाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजूची बॉक्स ऑफिस कमाई पहिल्या आठवड्यात 202.51 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 92.67 कोटी तर तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 2.80 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 2.55 कोटी होती. आता सिनेमाची एकूण कमाई 324.4 कोटी झाली आहे. कमाईचा प्रवासच असाच चालू राहिला तर लवकर सिनेमा 350 कोटींचा आकडा पार करेल.


रणबीरच्या करिअरमधील ब्लॉकबस्टर सिनेमा


आतापर्यंत रणबीर कपूरची बॉलिवूडमधील कारकीर्द जबरदस्त असली तरी 200 आणि 300 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणारा रणबीरचा हा पहिलाच सिनेमा आहे. संजू सिनेमापूर्वी रणबीर कपूरची रॉकस्टार आणि बर्फी सिनेमातील अभिनयाचेही भरभरुन कौतूक झाले होते. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमांनी काही खास कमाई केली नव्हती. पण संजू हा ब्लॉकबस्टर सिनेमा झाल्याने रणबीरचे करिअर एका वेगळ्या उंचीवर गेले आहे.


लागेल का धडकचा ब्रेक


आता शुक्रवारी शशांक खेतानचा धडक सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यामुळे संजूच्या कलेक्शनवर थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे. मराठी सिनेमा सैराटचा रिमेक असून यातून श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. आता धडक सिनेमा लावणार का संजूच्या कमाईला ब्रेक हे पाहणे, औत्सुक्याचे ठरेल.