मुबंई : भव्य दिव्य सेट्स, व्हीएफक्सचा इफेक्ट, तगडे कलाकार यामुळे उत्सुकता निर्माण झालेल्या एका सिनेमाकडून अपेक्षा असताना सिनेमाने प्रेक्षकांना ठगवणं म्हणजे काय हे सध्या ठग्ज ऑफ हिंदोस्तान या बहुचर्चित सिनेमाच्या बाबतीत घडतं. आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या सिनेमाची चर्चा खूप होती. दोन दिग्गज कलाकार एकाच सिनेमात पाहायला मिळणार असल्यामुळे पहिल्य़ा दिवशी प्रेक्षकांनी अँडव्हास बुकींग करत हा सिनेमा पाहिला त्यामुळे पहिल्या दिवशीच सिनेमाने ५० कोटींची कमाई केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांची जी अपेक्षा होती ती सपशेल फोल ठरली आहे. ह्या सिनेमाने प्रेक्षकांची निराशा केला. समीक्षकांनी सिनेमाला कमजोर ठरवलंच तसंच प्रेक्षकांनीही सिनेमा चांगला नसल्याची बातमी समाजमाध्यमातून ट्रोल करत एकमेकांना सांगत आपली नाराजी व्यक्त केली. या साऱ्याचा परिणम सिनेमाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईवर झाला. पहिल्या दिवशी ५० कोटींची झालेली कमाई दुसऱ्या दिवशी मात्र या सिनेमाला २८ कोटींच्या कमाईवर समाधान मानावं लागतंय. आज आणि उद्या शनिवार-रविवारच्या सुट्टी दरम्यान आता कमाईचे काय आकडे येतात हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 



तसेच या सिनेमाची सोशल मीडियावर देखील खूप खिल्ली उडवली जात आहे. हा सिनेमा कॉमेडी सिनेमा नसला तरीही प्रेक्षकांच चांगल मनोरंजन करत आहे. या सिनेमावरून अनेक जोस्क, व्हिडिओ आणि मेम्स व्हायरल होत आहेत.