मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यावर चित्रित झालेला 'वॉर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. सर्वाधिक कमाई करणारा 'वॉर' हा हिंदीतील 10 वा सिनेमा आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमांमध्ये सर्वाधिक कमाई 'वॉर' ने केली आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 'वॉर' ने 'कबीर सिंह' आणि 'उरी:द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमांना देखील मागे टाकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तरण आदर्श यांच्या मते 'वॉर' सिनेमाने आतापर्यंत 280.60 करोड रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तिन्ही भाषांमधील सिनेमाचा समावेश आहे. तज्ञांच्यामते, 'वॉर' हा सिनेमा 300 करोड रुपयांचा आकडा पार करेल. 




तरण आदर्श यांनी सांगितल्यानुसार, 'वॉर' हा सर्वाधिक कमाई करणारा 10 वा सिनेमा ठरला आहे. 1.'बाहुबली 2' (हिंदी), 2. 'दंगल', 3. 'संजू', 4. 'पीके', 5. 'टायगर जिंदा है', 6. 'बजरंगी भाईजान', 7. 'पद्मावत', 8. 'सुल्तान', 9. 'धूम 3' 10. 'वॉर'..'कबीर सिंह' 11व्या क्रमांकावर आहे तर 'उरी..' 12 व्या स्थानावर आहे. 



संपूर्ण जगभरातून सिनेमाने ४०६.५ कोटी रूपयांची मजल मारली आहे. ट्रेंड ऍनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहेत. महत्वाचं 'वॉर' सिनेमाने अभिनेता विक्की कौशलच्या 'उरी' सिनेमाला देखील मागे टाकले आहे. त्याचबरोबर अभिनेता सलमान खानच्या 'भारत' सिनेमाचा विक्रम 'वॉर' सिनेमाने मोडीत काढला आहे. 'खालीद कभी मेरा स्टूडंट हुआ करता था, अब उसे लगता हैं की वो अपने टिचर से आगे चला गया हैं...' अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' येत्या काळात किती कोटींपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.