मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया ‘डार्लिंग्स’ (Darlings) या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेली बद्रुनिस्सा शेख साकारतेय. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सोशल मीडियावर #BoycottAliaBhatt हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. कोणता चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सोशल मीडियावर असा ट्रेंड होणं ही काय नवीन गोष्ट नाही. एखादा विषय आवडला नाही किंवा मग भूमिका आवडली नाही तर अनेकदा त्यावर आक्षेप घेत नेटकरी त्या चित्रपटाला ‘बॉयकॉट’ करतात. दरम्यान, आलिया या चित्रपटातून पुरुषांवरील कौटुंबिक हिंसाचाराला (domestic violence) प्रेरणा देत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात अभिनेता विजय हा बद्रुनिस्साचा पती हमजा शेखची भूमिका साकारतोय. हमजा त्याच्या पत्नीवर कौटुंबिक अत्याचार करतो आणि त्याचाच सूड घेण्यासाठी बद्रु त्याचं अपहरण करते आणि राहत्याच घरी त्याला त्रास देते. चित्रपटाच्या टीझरमध्ये आलिया तिच्या पतीला तव्याने मारताना, त्याच्या तोंडावर पाणी फेकताना, त्याचं तोंड पाण्याच्या टाकीत बुडवताना दिसतेय. पतीने तिला ज्या पद्धतीने वागवलं, त्याच पद्धतीने ती त्याच्याशी वागताना दिसते. याच दृश्यांवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटातून आलिया ही कौटुंबिक हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अनेकांनी सोशल मीडियावर केला आहे.




आलिया ही भारतातील अँबर हर्ड आहे. भारतीय पुरुषांविरुद्ध ती कौटुंबिक हिंसाचाराला प्रेरणा देतेय, अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली. तर दुसरा नेटकरी म्हणाला, आलिया भट्टच्या या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटने केली आहे. या चित्रपटात आलियासोबत शेफाली शाह, विजय वर्मा, रोशन मॅथ्यू देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.