Boycott Brahmastra वरुन संतापली आलिया भट्ट, प्रदर्शनापूर्वीच बोलून गेली असं काही
बहुचर्चित चित्रपट Brahmastra उद्या सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून त्यापूर्वीच आलिया भट्टचं मोठं वक्तव्य
Brahmastra : अयान मुखर्जी (Ayan Mukherji) दिग्दर्शित आणि बहुचर्चित चित्रपट ब्रम्हास्त्र (Brahmastra) 9 सप्टेंबरला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादात अडकला आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), मौनी रॉय (Mouni Roy) आणि नागार्जुन (Nagarjun) अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता असली तर एक चिंता चित्रपटातील कलाकारांना सतावतेय. प्रदर्शनापूर्वीच Boycott Brahmastra ट्रेंड सुरु झाला आहे. याचसंदर्भात आलिया भटला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ती चांगलीच संतापली.
Boycott Brahmastra वरुन संतापली आलिया भट
मोठी स्टार कास्ट असलेल्या ब्रम्हास्त्रच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. चित्रपटातील कलाकारही मीडियाशी संवाद साधताना दिसत आहेत. अशाच एका पत्रकार परिषदेत ब्रम्हास्त्रमध्ये प्रमुख भूमिका असलेल्या आलिया भट्टला बॉयकॉट ब्रम्हास्त्रशी संबंधीत एक प्रश्न विचारण्यात आला. पण प्रश्न ऐकताच आलिया चांगलीच संतापली. हा प्रश्न होता, बॉयकॉट ट्रेंड सुरु असताना या वातावरणात ब्रम्हास्त्र चित्रपट प्रदर्शित करणं योग्य वेळ आहे का?
आलिया भट्टने दिलं असं उत्तर
पण हा प्रश्न आलिया भट्टला फारसा रुचला नाही, तीने पत्रकाराला उलट प्रश्न केला, या वातवरणात म्हणजे, हिंवाळा कि उन्हाळा की इतर कोणता ऋतू चित्रपटच्या प्रदर्शनासाठी योग्य आहे असं तुम्हाला वाटतं. जे होतंय ते आपल्याला स्विकारायला पाहिजे, असं उत्तर आलियाने दिलं. ब्रम्हास्त्र चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून त्याच्या निकालाबाबत आपण सकारात्मक असल्याचंही आलियाने म्हटलंय.
रणबीर कपूर आणि आलिय भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला ब्रम्हास्त्र हा चित्रपटा 9 सप्टेंबर 2022 ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळतोय.