boycott brahmastratrend on social media: आलिया रणबीर(alia ranbir )यांचा  बहुचर्चित  ब्रह्मास्त्र (brahmastra) सिनेमा अखेर रिलीज झाला.   रिलीजच्या आधी पासूनच  हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता रिलीज झाल्यानंतरसुद्धा सिनेमामागचा हा वाद  संपण्याचा नाव घेत नाहीये, सोशल मीडियावर #brahmastra boycott  ट्रेंड (trending)जोरात सुरु आहे. 


सिनेमा 9 सप्टेंबरला रिलीझ झाला त्यानंतर संमिश्र प्रतिसाद येतो आहे . नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर(social media) तुफान व्हायरल होतोय .


ज्यात एक व्यक्ती सिनेमागृहाच्या बाहेर हातात  स्पीकर घेऊन घोषणा देताना दिसतोय. सध्या सगळीकडे या व्हिडिओची खुप चर्चा आहे .सोशल मिडीयावर हा व्हिडीओ खूप पहिला जातोय खूप शेअर केला जात आहे, 


रणबीर कपूरचं बीफ प्रकरण आलं अंगाशी(Ranbir kapoor statement on eating beef) 


मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरने बीफ संधर्भात एक वक्तव्य केलं होतं. ''रणबीरचा एक 11 वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात रणबीरनं त्याला बीफ प्रचंड आवडतं असा धक्कादायक खुलासा केला होता.


आणि हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आणि त्याचा परिणाम ब्रह्मास्त्र सिनेमाच्या प्रमोशनवर झाला .सर्व स्तरातून ब्रह्मास्त्र सिनेमा बॉयकॉट (boycott brahmastra,boycott bollywood)करण्याची मागणी जोर धरू लागली. 


व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती हातात स्पीकर घेऊन म्हणतोय कि '' रणबीर कपूर म्हणतो आय लव्ह बीफ ,सर्व सनातनी एकत्र येऊन त्याला म्हणा बॉयकॉट ,आज रणबीर आणि आलियाला त्यांची लायकी दाखवूया सर्वानी  त्यांना बॉयकॉट करूया'' अशा घोषणा हा व्यक्ती देतोय ... 


 



एकूणच या सर्व प्रकारांचा सिनेमावर किती परिणाम होतो हे येत्या काही दिवसात कळेलच..