मुंबई : अभिनेत्री रेखा यांचा बंगला आता कोरोनामुक्त झाला आहे. रेखा यांच्या सिक्युरिटी गार्डला कोरोनाची लागण झाल्यानंतर रेखा यांचा बंगला सील करण्यात आला होता. कोरोना रुग्ण आढळल्यामुळे त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोनचा बोर्डही लावण्यात आला होता. जो आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे. बंगल्यावरची कंटेन्मेंट झोनची पाटी उतरवण्यात आली आहे. ११ जुलै रोजी रेखा यांचा  बंगला सील करण्यात आला होता. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला देखील सील करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोना लागण झाल्याने त्यांना नानानटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिग बींनंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांवर देखील नानानटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


देशात  कोरोना रुग्णांची  संख्या वाढत आहे. मात्र मृत्यू दर कमी आहे.  गेल्या २४ तासांत देशात ३७,१४८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. आतापर्यंतचा देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाख ५४ हजाराच्या पार गेला आहे. तर यामध्ये आतापर्यंत  २८,०९९ लोकांचा मृत्यू झाला आहे.