मुंबई: हॉलिवूड ब्रिटीश अभिनेता अल्बर्ट फिनी यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अल्बर्ट फिनी बऱ्याच काळापासून  गंभीर आजाराला झुंज देत होते. ते कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या अभिनयाची जादू संपूर्ण जगात पसरली होती. पाच वेळा त्यांना ऑस्कर पुरस्कारासाठी मानांकन मिळाले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 60 पोक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केले होते. 1936 साली जन्म झलेल्या फिनी यांच्या वडीलांचे नाव बुक मेकर होते. अल्बर्ट फिनी यांच्या शिक्षकांनी त्यांना अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याचा सल्ला दिला होता. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


1960 साली आलेल्या 'सॅटरडे नाइट अॅड संडे मॉर्निंग' सिनेमाने त्यांना खास ओळख मिळवून दिली. सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. रंगमंच कलाकार असणारे  अल्बर्ट काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांनी शेक्सपीअरच्या नाटकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या.