करीना कपूर खानचा धाकटा मुलगा Jeh ची बॉलिवूडमध्ये एंट्री
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच स्टीरियोटाइप ब्रेक करण्यामुळे ओळखली जाते.
मुंबई : करीना कपूर खान आणि सैफ अली खान सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. पहिल्यांदा करीनाने आपला दुसरा मुलगा जेहला सुट्टीवर नेलं आहे. करीनाच्या दोन्ही मुलांच्या नावांवरून वाद झाला होता. या सगळ्या चर्चांनंतर करिनाचा धाकटा मुलगा जेह आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच स्टीरियोटाइप ब्रेक करण्यामुळे ओळखली जाते. तिने तिच्या दोन्ही गर्भधारणेदरम्यान काम केलं आहे. ती केवळ तिच्या कार्यक्षेत्रातच खूप व्यस्त नाही तर तिने स्वतःची आणि तिच्या मुलाचीही काळजी घेतली आहे. जेव्हा करीना कपूरचा दुसरा मुलगा 'जेह' तिच्या पोटात होता, तेव्हा करीना 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाचं शूटिंग करत होती.
जेह दिसला चित्रपटात
करिना कपूरने सांगितलं आहे की, जेहच्या डिलिव्हरीपूर्वी करीना कपूर खान शूटिंगसाठी कशी पतौडी पॅलेसमधून हरियाणाला जायची. यासोबतच करीना कपूर खानने देखील जेह चित्रपटात कसा दिसला हे देखील सांगितलं आहे.
जेह रोमँटिक गाण्याचा भाग
'लाल सिंह चड्ढा'च्या शूटिंग दरम्यान करीना कपूर खान गर्भवती होती, तिने 'जेह' हा देखील या चित्रपटाचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्रीने सांगितलं की, तिच्या आणि आमिर खान यांच्यात एक रोमँटिक गाणं कसं चित्रित केलं गेलं आहे. ज्याचा 'जेह' देखील एक भाग आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली, 'व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं तर, माझा मुलगा देखील' लाल सिंह चड्ढा'चा एक भाग बनला आहे. तो माझ्या आणि आमिरच्या एका गाण्याचा भाग बनला आहे.