वाद विसरून पुन्हा एकत्र आले कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर; `बुआ` म्हणाली- `मला आधीच...`
Upasana Singh on Kapil Sunil Grover coming back : कपिल शर्मा शोमधील बुआनं दिली कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरच्या शोवर प्रतिक्रिया
Upasana Singh on Kapil Sunil Grover coming back : लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांचे लाखो चाहते आहेत. त्या दोघांनी त्यांच्या चाहत्यांना खूप मोठी भेट दिली आहे. ज्याची प्रतिक्षा प्रेक्षक गेल्या अनेक वर्षांपासून करत होते ते आता अखेरीस झाला आहे. कपिल आणि सुनील जवळपास 6 वर्षांनंतर सगळं विसरून पुन्हा एकत्र आले आहेत. तर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या एका शोसाठी ते दोघं एकत्र आले आहेत. त्याचा प्रोमो देखील प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोला पाहून कपिल शर्माची संपूर्ण टीम ही आनंदी झाली आहे. सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे की हे कधी आणि कसं झालं? आता अभिनेत्री उपासना सिंहनं देखील त्या दोघांच्या मैत्रीवर रिअॅक्ट केलं आहे,
कपिल शर्मानं शोमध्ये जेव्हा सुनील आणि कपिलची जोडी पाहायला मिळायची तेव्हा सगळ्यांना फार आनंद व्हायचा. शोमध्ये दोघेही प्रेक्षकांना खूप हसवायचे. पण जेव्हा सुनील ग्रोवरनं शो सोडला तेव्हा सगळ्या प्रेक्षकांना खूप वाईट वाटलं. खूप प्रतिक्षा केल्यानंतर आता त्यांचे दोन आवडते कलाकार एकत्र आल्यानंतर चाहत्यांना फार आनंद झाला आहे. कपिल शर्मा या शोमध्ये 'बुआ'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री उपासना सिंगनं देखील या कमबॅकवर आनंद व्यक्त केला आहे. 'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की कपिल-सुनीलसोबत आला ही खूप चांगली गोष्ट आहे. आमची टीम खूप चांगली आहे. आम्ही एक मज्जा करतो. दोन-अडीच वर्, आम्ही खूप मज्जा केली. सगळे जेव्हा एकत्र येऊन काम करत होते. तेव्हा खूप मस्त वाटायचं. दोघांविषयी ऐकूण बरं वाटलं.
हेही वाचा : अर्जुन कपूरचा VIDEO पाहून 'होणारी सून' मलायकासमोर बोनी कपूर यांना अश्रू अनावर
उपासना पुढे म्हणाली की तिला सुनील आणि कपिलच्या पॅचअपविषयी आधीच हिंट मिळाली होती. ती म्हणाली की 'कॅरी ऑन जट्टा चित्रपटा दरम्यान, 'सुनीलनं सांगितलं होतं की नेटफ्लिक्ससोबतच शोविषयी चर्चा सुरु आहे. आता दोघं एकत्र येत आहेत, तर यापेक्षा चांगलं काय असू शकतं.' जेव्हा उपासनाला विचारण्यात आलं की काय तिनं कपिल आणि सुनीलमध्ये झालेलं भांडण संपवण्याचा प्रयत्न केला? त्यावर तिनं सांगितलं की ते लोक समजुतदार आहेत. ते लहाण मुलं नाहीत. दोघं मोठे आहेत. काय योग्य आणि काय चुकीचं, याचा निर्णय स्वत: घेऊ शकतात.'