मुंबई : तुम्ही चित्रपटात पहिल्या नजरेत प्रेम झाल्याच्या घटना पाहिल्या असतीलच पण अनिल अंबानी यांची लव्हलाइफ कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नव्हती. देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकाचा मुलगा अनिल अंबानी बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनिमच्या प्रेमात पडले होते, मात्र टीना त्या दिवसांत संजय दत्तला डेट करत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल अंबानी पहिल्या नजरेतच टीना यांच्या प्रेमात
अनिल अंबानी यांनी एका लग्नात टीना मुनिमला पहिल्यांदा पाहिले. अनिल टीनाच्या प्रेमात पडले परंतु टीनाला अभिनेत्री व्हायची आवडत असल्याने त्यांचे अनिल यांचे कुटुंब टीनाच्या आणि अनिल यांच्या नात्याच्या विरोधात होते. आणि या कारणामुळे या दोघांचं ब्रेकअप झालं.



१९९८मध्ये अमेरिकेत भूकंप झाला आणि त्यानंतर टीना आणि अनिल अंबानी कायमचे एकमेकांचे झाले. अमेरिकेच्या लॉस एंजिल्समध्ये मोठा भूकंप झाला होता. त्यावेळी टीना देखील त्या ठिकाणी होती. अनिल अंबानी टीनाची चौकशी करण्यासाठी तिचा नंबर शोधून काढला आणि तिला कॉल करुन तिच्या आरोग्याबद्दल विचारपूस केली, यानंतर या दोघांचं संभाषण पुन्हा सुरू झालं. अखेर अनिल अंबानींच्या आग्रहापुढे त्यांच्या कुटुंबाला गुडघे टेकावे लागले


भूकंपाने दोघांना एकत्र आणलं
शेवटी कुटुंबीयांनी लग्नाला सहमती दिली आणि 1991 मध्ये अनिल अंबानी आणि टीना मुनिमचे लग्न झालं. अशाप्रकारे अनिल टीनाला अंबानी कुटुंबाची सून बनविण्यात यशस्वी झाले. अनिल अंबानी यांच्या साधेपणाबद्दल बोलताना टीना म्हणते, "मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांच्या साधेपणावर मी प्रभावित झाले."