मुंबई : सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर  बटरफ्लाय-बटरफ्लाय हे गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्या गाण्याला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. जर तुम्ही तुमचा वेळ सोशल मीडियावर जास्त घालवत असाल तर तुम्हाला या ट्रेण्डिंग गाण्याबद्दल माहितीच असेल. या व्हिडीओत काही शाळेतील मुलींचा ग्रुप बटरफ्लायवर थिरकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शालेय मुली बटरफ्लायवर  डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. बटरफ्लाय गाणं आणि मुलींचा व्हायरल डान्स आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बटरफ्लाय-बटरफ्लाय हे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यासमोरुन गेला असेल चिमुकल्या मुलींचा व्हायरल डान्स. या व्हायरल गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवले. सोशल मीडियावर हे गाण इतकं व्हायरल झालं की, यानंतर याचे अनेक अपडेट गाणी व्हायरल झालीय जशी की, एपल एपल रेड रेड एपल हे गाणं देखील खूप व्हायरल झालं होतं. सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच चर्चा रंगली होती. प्रत्येकजण यावर रिल्स बनवत होतं. याचे अनेक रिल्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरलही होत होते. मग यात आपले सेलिब्रिटी कसे मागे राहतील. या धमाल रिल्सवर आपले सेलिब्रिटीही थिरकले आहेत. बटरफ्लाय-बटरफ्लायवर आता "मर्डरवाले कुलकर्णी"ची टीम थिरकली आहे. 


समोर आलेल्या या सेलिब्रिटींच्या व्हायरल रिल्सवर युजर्स जोरदार कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एकाने कमेंट करत लिहीलं की, मस्त भार्गवी ताई खूप छान. तर अजून एकाने लिहीलंय, र्वांनी छान केलं , कोणीच चुकल नाही, एकदम तालात, लई भारी, तर अजून एकाने लिहीलंय, आवडलय. तर अजून एकाने लिहीलंय, काय गं हे. तर अजून एकजण म्हणतोय, अरे जरा हसा की. तर अजून एकाने लिहीलंय, खूपच भारी. तर अजून एकाने लिहीलंय, तुम्ही हे हसल्याशिवाय कसं केलं.... मला तर हसू आवरता आलं नाही. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या सेलिब्रिटींची ही स्टाईल त्यांच्या चाहत्यांना भलतीच आवडली आहे. युजर्स या रिल्सच जोरदार कौतुक करत आहेत.