मुंबई : चित्रीकरणादरम्यान होणाऱ्या दुर्घटना आणि संभाव्य संकटं पाहता सहसा संपूर्ण टीम ही तयारीनिशी चित्रीकरणाची सुरुवात करते. पण, अनावधानाने गोष्टी बिघडतात आणि होत्याचं नव्हतं घडतं. मुंबईच्या फिलमसिटीमध्ये सध्या अशीच एक घटना घडली. जिथं एक विचित्र अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील फिल्मसिटीमध्ये खंडाळा रोड येथे एक अपघात झाला, जिथे ‘द गर्ल’ नावाच्या एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच अचानकच कार पलटली. कार पलटणं स्क्रीप्टमध्ये होतं. पण, कार जिथं कार पलटणं अपेक्षित होतं, ती तिथे थांबलीच नाही आणि ही दुर्घटना घडली.


माध्यमांच्या वृत्तानुसार एका स्टंट सीनचं चित्रीकरण सुरु असताना कार एका जागी पलटून नंतर घसपटत पुढे जाणं अपेक्षित होतं. पण, असं न होता काही अंतर पुढे जाऊन ही कार कॅमेरा ट्रॉली आणि तिथंच उभं असणाऱ्या एका टेम्पोवर जाऊन आदळली. अपघात नेमका कसा झाला, हे कळण्यापूर्वीच तिथं कॅमेरा अटेंडंट जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याव्यतिरिक्त आणखी कोणत्याची दुखापतीची माहिती नाही. 


कोणालाही कल्पना नसताना, हा अपघात घडला, या घटनेची दृश्य पाहता मोठा अनर्थ टळला, अन्यथा काय पाहावं लागलं असतं याची कल्पनाही कोणी करु शकत नाही.