कॅनडा : कॅट कलिंगर या कॅनेडियन मॉडेलला डोळ्यात टॅटू बनवणं महागात पडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोळ्याच्या पांढर्‍या भागावर टॅटू बनवताना झालेल्या एका चूकीमुळे या मॉडेलची दृष्टी गेली आहे. एका डोळ्याची तिची पूर्ण दृष्टी गेल्याने अंधत्त्व आले आहे.


कॅट कलिंगरने तिचा अनुभव फेसबुकवर लिहला आहे. २४ वर्षीय कॅटच्या डोळ्यांतून जांभळ्या रंगाचं पाणी वाहत आहे. तसेच तिच्या डोळ्यांमध्ये प्रचंड वेदना होत आहेत. जांभळ्या रंगांचं पाणी थांबवण्यासाठी जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तिला अ‍ॅन्टिबायोटिक्स ड्रॉप्स देण्यात आले आले. मात्र या ड्रॉप्सचा साईडइफेक्ट झाल्याने तिच्या डोळ्याला सूज आली. 



 


आठवड्याभराने कॅटची दृष्टी गेली. डॉक्टरांच्या मते, टॅटू बनवण्यासाठी ज्या यंत्राचा वापर केला ते योग्यरित्या साफ केलेले नव्हते. त्यामुळे इंफेक्शन डोळ्यात पसरले. आता या इंफेक्शनवर उपाय नसल्याने तिला कायम स्वरूपाचे अंधत्त्व आले आहे.