मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगणा रानौतला तुम्ही यापूर्वीही रेट्रो लूकमध्ये पाहिले असेल. पण कांस फिल्म फेस्टिवलमध्ये कंगणाचा रेट्रो लूकमध्ये अवतरली. फॅशन डिजाईनर सब्यासाचीने तयार केलेली साडी नेसून कंगणाने कांस फेस्टिवलला हजेरी लावली. नेहमीच इतरांपेक्षा वेगळे काही करण्याची तिची ओळख तिला खास वेगळी ओळख देऊन जाते. इतर अभिनेत्रींप्रमाणे गाऊन नाही तर तिच्या पसंतीप्रमाणे साडी नेसून कंगणा फेस्टिवलमध्ये दाखल झाली. कंगणाचा लूक एकदम क्लासी आणि ऑल ब्लॅक होता. ब्लॅक साडीवर तिने मोत्यांच्या नेकपीस घातला होता आणि शॉर्ट हेअर स्टाईल केली होती. 


कंगणाचा रेट्रो लूक...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगणाच्या या वेगळ्या आकर्षक लूकमुळे कांस फेस्टिवलमध्ये सर्वांच्या नजरा कंगणावर खिळल्या होत्या. कंगणाने फिल्म फेस्टिवलमध्ये सेंसर बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशीसोबत एंट्री घेतली. क्वीन सिनेमामुळे कंगणाला या फेस्टिवलमध्ये येण्याची संधी मिळाली. पुढे येणाऱ्या दिवसात कांस फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर वर्णी लावणार आहेत. 



या दोन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला


आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांमुळे कंगणा नेहमी चर्चेत असते. कंगणा लवकरच पिरीयड ड्रामा फिल्म 'मणिकर्णिका-द क्वीन' ऑफ झांसी मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय राजकुमार रावसोबत 'मेंटल है क्या' मध्येही ती झळकेल.