माझ्या कुटुंबाचं नाव घेतलंच कसं? अभिनेत्याचा मंत्र्याविरुद्ध 100 कोटींचा खटला
नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटावर विधान करून कोंडा सुरेखा यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना नाराज केले आहे. नागार्जुनने सुरेखा यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.
Nagarjuna : नागार्जुन यांनी कोंडा सुरेखा यांची माफी नाकारली असून मंत्र्यावर आणखी एक मानहानीचा खटला दाखल केला आहे. तेलंगणाचे राजकारणी कोंडा सुरेखा यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता की, केटीआरमुळे नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून नागार्जुन यांनी कोंडा सुरेखा यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. आता त्याने 100 कोटींचा आणखी एक मानहानीचा खटला दाखल केला आहे.
टाइम्स नाऊशी बोलताना नागार्जुन म्हणाला की, आम्ही काल एक फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला. आम्ही त्याच्यावर आणखी 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यांची अपमानास्पद वक्तव्य लपवता येणार नाही. आता ती म्हणते की ती आपली वक्तव्य मागे घेत आहे. तिने स्पष्टपणे समंथाची माफी मागितली आहे. पण माझ्या कुटुंबाचे काय? मी किंवा माझ्या कुटुंबाकडून माफीचा एक शब्दही नाही.
आमचे नाव राजकीय फायद्यासाठी वापरू शकत नाही
मंत्र्याच्या माफीनंतर तुम्ही केस मागे घेणार का असा प्रश्न नागार्जुनला विचारले असता त्याने अजिबात नाही असं उत्तर दिले. तो म्हणाला की, आता वैयक्तिक राहिलेले नाही. बदनामी फक्त माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पलीकडे पोहोचली आहे. तेलगू इंडस्ट्रीतील मोठ्या ते लहान नावांपर्यंत आम्हाला पाठिंबा मिळत आहे. आमचे नाव राजकीय फायद्यासाठी वापरू शकत नाही. आम्ही मनोरंजन उद्योगातील लोक यापुढे सोपे लक्ष्य बनणार नाही. मला अशा आहे की, मंत्र्याविरुद्धची आमची कायदेशीर कारवाई इतर राजकारण्यांना आमचे नाव अपमानास्पद रितीने वापरण्यापासून परावृत्त करेल.
कोंडा सुरेखा यांच्यावर इंडस्ट्रीतील लोक नाराज
नागा चैतन्य आणि समंथा यांच्यातील मतभेदाला रामाराव जबाबदार असल्याचा दावा केला होता. ज्यामुळे वादाला तोंड फुटले होते. सुरेखा यांच्या मते, केटीआरच्या कथित हस्तक्षेपामुळे अक्किनेनी कुटुंबात मतभेद निर्माण झाले. ज्यामुळे समंथा आणि नागा यांच्यात घटस्फोट झाला. कोंडा सुरेखा यांनी दावा केला की केटी रामाराव यांनी मागणी केली होती की जर नागार्जुन अक्किनेनींना त्यांचे एन - कन्वेंशन सेंटर वाचवायचे असेल तर त्यांनी समंथाला त्यांच्याकडे पाठवावे. कोंडा सुरेखा यांच्या मते, जेव्हा समंथा रुथ प्रभूने नकार दिला तेव्हा ती नागा चैतन्यपासून विभक्त झाली.