Cardi B VIDEO : आजकाल अनेक गायकांचे लाइव्ह पर्फॉर्मन्स आपण पाहतो. लाइव्ह शोसाठी हे गायक अनेक देशांमध्ये जात असतात. इतकंच नाही तर गायकांसोबत त्यांचे चाहते देखील कुठच्या कुठून प्रवास करताना दिसतात. दरम्यान, बऱ्याचवेळा अनेक गायकांना लाइव्ह शो दरम्यान, ट्रोल करण्यात येते किंवा त्यांना योग्य ती वागणूक मिळत नाही. त्यांच्यावर स्टेजवर असताना हल्ला करण्यात येतो तर कधी त्यांच्यावर काही गोष्टी फेकूण देण्यात येतात. असाच काहीचा प्रसंग रॅपर कार्डी बीसोबत घडला आहे. एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये कार्डी बीसोबत हा प्रकार घडला. या कार्यक्रमात एका व्यक्तीनं कार्डी बीवर कोल्ड ड्रिंक फेकल्यानंतर त्यावर कार्डी बीनं जे केलं ते पाहून सगळ्यांना धक्का बसला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्डी बीचा हा व्हिडीओ डेली लाऊंडनं शेअर केला आहे. रिपोर्टनुसार, कार्डी-बी तिचं सुपरहिट गाणं Bodak Yellow वर परफॉर्म करत होती. त्यावेळी कार्डी बीनं नारंगी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर स्टेजवर वॉक करत असलेल्या कार्डी बीवर अचानक एका व्यक्तीनं त्यांच्या हातात असलेली ड्रिंक उडवलं. कार्डी त्यावेळी लगेच तिथे थांबली आणि एक पाऊल मागे घेतलं तरी देखील तिच्या अंगावर त्या कोल्ड ड्रिंकचे ड्रॉप उडाले. यावेळी हे पाहून कार्डीला प्रचंड राग आला. तिनं लगेचच तिच्या हातात असलेला माईक त्या व्यक्तीला फेकून मारला. कार्डी बीनं असे करताच तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांमध्ये धांदल उडाली आणि त्यानंतर लगेचच सिक्योरिटीच्या लोकांनी त्या व्यक्तीला पकडले आणि गर्दीतून बाहेर घेऊन गेले. 



हेही वाचा : दीपिकानं शोएब इब्राहिमशी लग्न केल्यानंतर गमावली स्वत:ची ओळख, अभिनेत्री फलक नाजचं वक्तव्य चर्चेत


ही घटना फक्त कार्डी बीसोबत नाही तर या आधी अशी घटना ही गायक आणि सॉंग रायटर हॅरी स्टाईलसोबत अशा प्रकारची घटना घडली होती. ही घटना तेव्हाच घडली जेव्हा हॅरी स्टेजवर परफॉर्म करत होता आणि एका व्यक्तीनं हॅरीवर हल्ला केला. या आधी बेबी रेक्सा, ड्रेक, Kelsea Ballerini, Steve Lacy, Kid Cudi  आणि पिंकवर देखील परफॉर्मेंस सुरु असताना करण्यात आलं आहे.